मुख्यपृष्ठ / पाककृती / कारल्याच्या सालांची भाजी

Photo of Bittergourd stir fry by Susmita Tadwalkar at BetterButter
638
3
0.0(0)
0

कारल्याच्या सालांची भाजी

Jul-21-2018
Susmita Tadwalkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारल्याच्या सालांची भाजी कृती बद्दल

कारल्याची असूनही फारशी कडवट न होणारी आणि डब्यात द्यायला एकदम योग्य अशी सुकी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २-३ कारली
  2. २ बारिक चिरलेले कांदे
  3. १ मोठा चमचा तेल
  4. १/२ चमचा मोहरी, थोडा हिंग व हळद
  5. मिठ चवीप्रमाणे
  6. कोथिम्बीर चिरलेली
  7. तिखट, धणे-जिरे पावडर, गरम मसाला आणि एखादा आवडीचा मसाला चवीप्रमाणे

सूचना

  1. कारल्याची साले हलक्या हातानी किसून घ्या
  2. थोडं मिठ घालून १० मिनिटं ठेवा
  3. कढ‌ईमध्ये तेल गरम करून घ्या व त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा
  4. बारिक चिरलेला कांदा घाला व परतून घ्या
  5. आता किसलेली साले हातानी दाबून कांद्यावर टाका
  6. चवीप्रमाणे तिखट, मिठ व बाकी मसाले घाला व परतून घ्या
  7. कोथिम्बीर घाला व थोडा वेळ परता
  8. डब्यासाठी भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर