पनीर टिक्का काठी रोल | Paneer tikka Kathi roll Recipe in Marathi

प्रेषक Reena Andavarapu  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Paneer tikka Kathi roll recipe in Marathi,पनीर टिक्का काठी रोल, Reena Andavarapu
पनीर टिक्का काठी रोलby Reena Andavarapu
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

10

0

पनीर टिक्का काठी रोल recipe

पनीर टिक्का काठी रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer tikka Kathi roll Recipe in Marathi )

 • पनीर २०० ग्रामस
 • चिल्ली सॉस आवश्यक अनुसार
 • कैप्सिकम १ /२
 • कांदा २
 • मॅरिनेशन साठी :
 • दही - १ /२ कप
 • चाट मसाला - १ /२ छोटा चमचा
 • लाल तिखट - १ छोटा चमचा
 • तंदूरी मसाला - १ /२ छोटा चमचा (ऑप्शनल)
 • आले लसूण पेस्ट - १ छोटा चमचा
 • हळद चीमू्‍टभर
 • कसूरी मेथी - २ मोठा चमचा
 • बेसन - २ मोठा चमचा
 • मीठ चविनुसार
 • गव्हाचे पीठ - २ कप
 • मीठ चविनुसार
 • तेल १ छोटा चमचा
 • तूप आवश्यकतेनुसार
 • कोमट पाणी

पनीर टिक्का काठी रोल | How to make Paneer tikka Kathi roll Recipe in Marathi

 1. काठी रोल बनवण्यासाठी कोमट पाण्याने चपातीसाठी कणिक बनवून घ्या. झाकून ठेवावे.
 2. पनीरचे छोटे तुकडे कापून घ्यावे. कैप्सिकम अणि कांदा बारीक चिरून घ्यावे.
 3. मॅरिनेशन साठी दिलेलं साहित्य घेऊन पनीर मॅरीनेट करून ठेवावे. झाकून ठेवावे.
 4. कणकेचे लिंबाच्या आकाराचे छोटे गोळे बनवा. प्रत्येक गोळ्याची पोळी लाटून त्यावर तूप लावा. घडी करून गोल बनवा आणि परत पोळी लाटा (घडीची पोळी बनवा )
 5. तूप लावून दोन्ही बाजू भाजून घ्या
 6. अशा रीतीने सगळ्या पोळ्या बनवून घ्या
 7. एका पॅन मध्ये तेल घालून कैप्सिकमचे तुकडे फ्राई करा. त्यात मॅरीनेट केलेले पनीर घालून सेमी फ्राई करा.
 8. रोल बनवण्यासाठी पोळी घ्या. एका बाजूला पनीर टिक्का घालून, त्यावर कांदा पसरून, त्यावर चिल्ली सॉस टाका.
 9. दुसरी बाजू फोल्ड करून घट्ट रोल बनवा
 10. मधोमध कापून टिफिन किंवा लंच बॉक्स मध्ये पैक करा.

Reviews for Paneer tikka Kathi roll Recipe in Marathi (0)