BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर टिक्का काठी रोल

Photo of Paneer tikka Kathi roll by Reena Andavarapu at BetterButter
255
4
0(0)
0

पनीर टिक्का काठी रोल

Jul-22-2018
Reena Andavarapu
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर टिक्का काठी रोल कृती बद्दल

न्यूट्रिशन, प्रोटीन, फायबर सगले एकच रोल मध्ये. चविष्ट अणि पोट भरणारे एक रोल मध्ये पूर्ण जेवण

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • इंडियन
 • सौटेइंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. पनीर २०० ग्रामस
 2. चिल्ली सॉस आवश्यक अनुसार
 3. कैप्सिकम १ /२
 4. कांदा २
 5. मॅरिनेशन साठी :
 6. दही - १ /२ कप
 7. चाट मसाला - १ /२ छोटा चमचा
 8. लाल तिखट - १ छोटा चमचा
 9. तंदूरी मसाला - १ /२ छोटा चमचा (ऑप्शनल)
 10. आले लसूण पेस्ट - १ छोटा चमचा
 11. हळद चीमू्‍टभर
 12. कसूरी मेथी - २ मोठा चमचा
 13. बेसन - २ मोठा चमचा
 14. मीठ चविनुसार
 15. गव्हाचे पीठ - २ कप
 16. मीठ चविनुसार
 17. तेल १ छोटा चमचा
 18. तूप आवश्यकतेनुसार
 19. कोमट पाणी

सूचना

 1. काठी रोल बनवण्यासाठी कोमट पाण्याने चपातीसाठी कणिक बनवून घ्या. झाकून ठेवावे.
 2. पनीरचे छोटे तुकडे कापून घ्यावे. कैप्सिकम अणि कांदा बारीक चिरून घ्यावे.
 3. मॅरिनेशन साठी दिलेलं साहित्य घेऊन पनीर मॅरीनेट करून ठेवावे. झाकून ठेवावे.
 4. कणकेचे लिंबाच्या आकाराचे छोटे गोळे बनवा. प्रत्येक गोळ्याची पोळी लाटून त्यावर तूप लावा. घडी करून गोल बनवा आणि परत पोळी लाटा (घडीची पोळी बनवा )
 5. तूप लावून दोन्ही बाजू भाजून घ्या
 6. अशा रीतीने सगळ्या पोळ्या बनवून घ्या
 7. एका पॅन मध्ये तेल घालून कैप्सिकमचे तुकडे फ्राई करा. त्यात मॅरीनेट केलेले पनीर घालून सेमी फ्राई करा.
 8. रोल बनवण्यासाठी पोळी घ्या. एका बाजूला पनीर टिक्का घालून, त्यावर कांदा पसरून, त्यावर चिल्ली सॉस टाका.
 9. दुसरी बाजू फोल्ड करून घट्ट रोल बनवा
 10. मधोमध कापून टिफिन किंवा लंच बॉक्स मध्ये पैक करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर