मुख्यपृष्ठ / पाककृती / छोले राजमा मसाला व्हेज पुलाव

Photo of Chhole Rajma Pulao by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
909
2
0.0(0)
0

छोले राजमा मसाला व्हेज पुलाव

Jul-22-2018
Shubha Salpekar Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले राजमा मसाला व्हेज पुलाव कृती बद्दल

वन पॉट मिल असा हा व्हेज पुलाव अतिशय चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा आहे। छोले, राजमा, पनीर, गाजर, मटार, मक्याचे दाणे हे सगळं घालून केलेला हा पुलाव लंच-बॉक्स साठी योग्य पर्याय आहे।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाटी बासमती तांदूळ
  2. 3-4 टेबल स्पून तूप
  3. तेल कांदा तळायला
  4. खडे गरम मसाले ( जीरं, शाह जीरं, गोल मिरी, लवंग, विलायची, जावित्री, तेजपान, दालचिनी, स्टार फूल)
  5. उकळलेले राजमा आणि छोले 2 वाटी
  6. 1 वाटी पनीर चे तुकडे
  7. 1 मोठा टमाटा
  8. 5-6 लसूण पाकळ्या
  9. 1" आलं
  10. 1 मोठा कांदा
  11. 1 टेबल स्पून चणा मसाला
  12. 1/2 टेबल स्पून तिखट
  13. मीठ चवीनुसार
  14. बारीक चिरलेली कोथिंबीर
  15. बारीक चिरलेला पुदिना

सूचना

  1. तांदूळ धुवून, 1/2 तास भिजत घालावे.
  2. छोले राजमा रात्र भर भिजत ठेवावे। आणि कुकर मध्ये शिजवून घ्यावे।
  3. टमाटा, लसूण, आलं मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे।
  4. कांदा तळून घ्यावा।
  5. गाजर, मटार, मक्याचे दाणे उकळून घ्यावे।
  6. ताँदूळात अक्खे गरम मसाले, मीठ आणि थोडं तूप घालून शीजवून घ्यावे।
  7. कढईत तूप तापवायला ठेवावे, जिरं घालावे, बारीक केलेला मसाला घालावा। 3-4 मिनिटे परतावा।
  8. आता ह्यात उकळलेले छोले, राजमा, गाजर, मटार, मक्याचे दाणे, पनीर घालावे।
  9. वरून चणा मसाला आणि तिखट घालून परतावे।
  10. आता शिजलेला भात, मीठ, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना घालून मिक्स करावे।
  11. हा पुलाव नुसताच खायला खूप छान लागतो। पण सोबतिला केचप किंवा रायता पण देऊ शकता।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर