मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबी माँच्युरीयन

Photo of Manchurian by Arya Paradkar at BetterButter
590
2
0.0(0)
0

कोबी माँच्युरीयन

Jul-22-2018
Arya Paradkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी माँच्युरीयन कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2-3 खिसलेले गाजर
  2. पाव किलो खिसलेला कोबी
  3. 2 बारीक चिरलेली सिमला मिरची
  4. 2-3 चमचे बीटाचा रस
  5. 5-6 खिसलेल्या लसूण पाकळ्या
  6. 1 इंच खिसलेले आले
  7. 2 बारीक चिरलेली मिरची
  8. 1/2 वाटी मैदा
  9. पाव वाटी कॉर्न फ्लोअर
  10. चवीनुसार मीठ
  11. तळण्यासाठी तेल
  12. ** माँच्युरीयन सॉस साहित्य **
  13. 1 बारीक चिरलेला कांदा
  14. 1 बारीक चिरलेली सिमला मिरची
  15. 2-3 चमचे बारीक चिरलेला लसूण
  16. 1 1/2 चमचा खिसलेले आले
  17. 2 चमचे बारीक चिरलेली मिरची
  18. 3 चमचे सोया सॉस
  19. 3 चमचे रेड चिली सॉस
  20. 3 चमचे टोमॅटो सॉस
  21. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर
  22. मीठ चवीनुसार
  23. तेल
  24. 1/2 चमचा साखर
  25. पाणी

सूचना

  1. प्रथम माँच्युरीयन चे साहित्य एकत्र करून चांगले मळून घेणे, पाणी अजिबात घालू नये
  2. तेल गरम करून
  3. वरील मिश्रणाचे भजी तळून घ्यावे
  4. माँच्युरीयन सॉस करण्यासाठी
  5. प्रथम तेल गरम करून त्यात कांदा ,सिमला मिरची घालून चांगले परतून घ्यावे
  6. त्यात आले लसूण मिरची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे
  7. नंतर त्यात रेड चिली सॉस, सोया सॉस व टोमॅटो सॉस घालणे, 2 ग्लास पाणी घालून उकळणे
  8. काॅर्न फ्लोअर मधे थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करून ती हळूहळू मिक्स करणे गुठळ्या होऊ देऊ नये
  9. चवीनुसार मीठ व साखर घालावी
  10. एक चांगली उकळी आणावी
  11. माँच्युरीयन बॉलवर माँच्युरीयन सॉस घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर