Photo of Carrot halwa by Teju Auti at BetterButter
1001
4
0.0(0)
0

गाजर. हलवा

Jul-22-2018
Teju Auti
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर. हलवा कृती बद्दल

Sweet dish

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ कप गाजराचा कीस
  2. ४ टेबलस्पून साजूक तूप
  3. १/२ कप साखर
  4. १/२ टीस्पून वेलचीपूड
  5. २ टेबलस्पून बेदाणे
  6. २ टेबलस्पून बदामाची कापं
  7. १ कप दुध
  8. १/४ कप + १ टेबलस्पून खवा
  9. चिमटीभर मीठ

सूचना

  1. नॉनस्टिक भांड्यात तूप गरम करा. आणि त्यात गाजराचा कीस घालून १०-१५ मिनिटे परतून घ्या. परतून किसाचे प्रमाण थोडे कमी झालेले दिसेल आणि त्याला चकाकी येईल.
  2. कीस चांगला शिजला आहे याची खात्री करून त्यात साखर घाला आणि चांगले एकत्र करा. ५-७ मिनिटे परता.
  3. त्यात वेलची पूड, बेदाणे आणि बदाम घाला. दुध घालून दुध आटे पर्यंत परता.
  4. वेगळ्या भांड्यात खवा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. त्याला किंचित तूप सुटेल. खवा परतलेल्या गाजराच्या किसात मिक्स करा.
  5. सगळा हलवा पुन्हा एकदा परतून घ्या. आणि गरम किंवा थंड आवडी प्रमाणे सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर