Photo of Dadpe pohe by archana chaudhari at BetterButter
279
3
0.0(0)
0

दडपे पोहे

Jul-22-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दडपे पोहे कृती बद्दल

डब्यामध्ये नेण्यासाठी खूपच छान आणि पटकन होणारा पदार्थ. दडप्या पोह्यांची लज्जतच काही न्यारी!!!!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पातळ पोहे १ १/२ कप
  2. नारळाचे पाणी १/२ कप
  3. नारळाचा चव १ कप
  4. कांदा १ मध्यम बारीक चिरलेला
  5. लिंबू १/२
  6. हिरवी मिरची १ बारीक चिरलेली
  7. साखर १ टेबलस्पून
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल १टेबलस्पून
  10. मोहरी १/२ टीस्पून
  11. शेंगदाणे १टेबलस्पून
  12. हिंग १/२ टीस्पून
  13. कढीपत्ता ५ पाने

सूचना

  1. पातळ पोहे चाळून,१ मिनिट कढईत शेकून घ्या.
  2. एका भांड्यात पातळ पोहे,नारळाचे पाणी,नारळाचा चव,साखर एकत्र करून झाकून ठेवा.
  3. कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळुन वरील पोह्यांवर घाला.
  4. आता त्याच तेलात,मोहरी, हिंग,कढीपत्ता टाकून फोडणी करा.
  5. फोडणी पोह्यांवर घाला.
  6. आता पोह्यांवर हिरवी मिरची, कापलेला कांदा, लिंबू, मीठ टाकून छान एकत्र करून घ्या.
  7. झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे दडपून (झाकून ) ठेवा.
  8. दडपे पोहे तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर