साबुदाणा आप्पे | Sogo aape Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sogo aape recipe in Marathi,साबुदाणा आप्पे, Teju Auti
साबुदाणा आप्पेby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

साबुदाणा आप्पे recipe

साबुदाणा आप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sogo aape Recipe in Marathi )

 • १ वाटी साबुदाणा
 • ३/४ वाटी उकडून कुस्करलेला बटाटा
 • ३ छोटे चमचे दही
 • २-३ हिरव्या मिरच्या
 • जिरे
 • मीठ चवीनुसार
 • १/२ वाटी दाण्याचे कूट
 • तेल
 • साखर

साबुदाणा आप्पे | How to make Sogo aape Recipe in Marathi

 1. अप्पे बनविण्यापूर्वी साबुदाणे ३-४ तास भिजू घालावे.
 2. भिजलेल्या साबुदाण्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, जिरे, दाण्याचे कूट, वाटलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ व दही घालून चांगले ढवळून घ्यावे.
 3. अप्पे पात्राला तेल लावून गरम करावे.
 4. गरम पात्रात चमच्याने मिश्रण घालावे.
 5. मध्यम आचेवर ठेवून झाकण ठेवावे साधारण ३-४ मिनिटे होवू द्यावे.
 6. झाकण काढून पहावे रंग बदलल्यास पलटावे व दुसऱ्या बाजुनेही छान करून घ्यावे.
 7. आवश्यक वाटल्यास थोडे थोडे तेल सोडत रहावे. दोन्ही बाजूनी झाले की पात्रातून काढावे व प्लेटमध्ये दही सर्व्ह करावे.

My Tip:

मिश्नण तयार करताना पाणी हवे असल्यास थोडे पाणी घ्यावे

Reviews for Sogo aape Recipe in Marathi (0)