Photo of Pav bhaji by seema Nadkarni at BetterButter
670
3
0.0(0)
0

पाव भाजी

Jul-23-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाव भाजी कृती बद्दल

आज सन्डे आहे, त्यामुळे नाश्ता पन वेगळा आहे. आज चा स्पेशल ब्रेकफास्ट पाव भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 ग्राम बटाटे
  2. 100 ग्राम कोबी
  3. 50 ग्राम फ्लावर
  4. 50 ग्राम भोपळी मिरची
  5. 100 ग्राम मटार
  6. 4-5 कांदे
  7. 500 ग्राम टोमॅटो
  8. 2 चमचा लाल तिखट
  9. 1 चमचा पाव भाजी मसाला
  10. 1/2 चमचा हळद
  11. 2-3 चमचा लिंबाचा रस
  12. कोथिंबीर
  13. चवी पुरते मीठ

सूचना

  1. प्रथम सवॅ भाज्या बटाटे, कोबी, फ्लॉवर वांगी मध्यम आकाराचे तुकडे करून कूकर मध्ये शिजवून घ्या, त्यात मटार पण शिजवून घ्या
  2. कूकर थंड झाल्यावर भाज्या एकत्र करून घ्यावे.
  3. कांदे, टोमॅटो, भोपळी मिरची बारीक चिरून घ्यावी.
  4. कढई मध्ये 4-5 चमचा तेल घालून, त्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो चांगले परतून घ्या.
  5. बारीक चिरलेली भोपळी मिरची घालून परतून घ्यावे.
  6. तेल सुटायला आले की त्यात वरील शिजवून घेतलेल्या भाज्या घालून या मिश्रणा ला व्यवस्थित एकत्र करावे.
  7. त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ, हळद, पाव भाजी मसाला घालून एकत्र करावे.
  8. थोड्या वेळ झाकून ठेवावे, दूसरया छोट्या कढई मध्ये थोडे बटर टाकून त्यात थोडे लाल तिखट घालून वरून फोडणी करावी.
  9. छान रंग येईल भाजी ला, गॅस बंद करून वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सवँ करावे.
  10. बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, कोबी, चिरून सॅलड तैयार करावे.
  11. 2-3 चमचा बटर घालून भाजी - बटर मध्ये भाजलेले पाव- सॅलड सोबत सर्व करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर