BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीची उसळ

Photo of Turichi usal by Smita Koshti at BetterButter
0
3
0(0)
0

तुरीची उसळ

Jul-23-2018
Smita Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीची उसळ कृती बद्दल

सोपी आणि पोटभरीची अशी ही पाककृती आहे. डब्यात न्यायला उत्तम.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या भिजवलेले तुर दाणे
  2. 2 मोठे कांदे बारीक चिरून
  3. 1 बारीक चिरून टोमॅटो
  4. 4..5 बारीक चिरून लसूण पाकळ्या
  5. लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त
  6. 4..5 पाने कढीपत्ता
  7. 1/2 चमचा धणे पूड
  8. मीठ चवीनुसार
  9. 1/4 चमचा हळद
  10. 1/4 चमचा गरम मसाला
  11. 1/2 चमचा जिरे
  12. 1/2 चमचा मोहरी
  13. चिमूटभर हिंग
  14. कोथिंबीर बारीक चिरून

सूचना

  1. रात्रभर भिजत घातलेली तुर दाणे थोडे मीठ आणि हळद, पाणी घालून कुकरमध्ये दोन शिट्ट्या घ्या
  2. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे तडतडल्यावर त्यात कढीपत्ता, हिंग घालून कांदा परतून घ्या
  3. नंतर त्यात टोमॅटो टाकून चांगले परतून घ्या
  4. मग त्यात हळद, धणे पूड, तिखट, गरम मसाला घालून चांगले परतून घ्या.
  5. नंतर त्यात शिजवलेले तुर दाणे, व थोडे मीठ घालून चांगले परतून घ्या व एक वाफ आल्यावर त्यात कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
  6. उसळ तयार. डब्यात देताना जर पातळ देणे शक्य असेल तर तुर दाणे शिजवलेले पाणी वापरून रस्सा करू शकतो.
  7. ही उसळ अशीच छान लागते.. मिसळ सारखी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो टाकून, बारीक शेव, दही, लिंबू रस टाकून.
  8. पण तुम्ही ही पोळी सोबत ही भाजी सारखी खाऊ शकता. अप्रतिम चव येते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर