वरई साबुदाणा रोल (उपवासाचे ) | Varai Sabudana Roll Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Varai Sabudana Roll recipe in Marathi,वरई साबुदाणा रोल (उपवासाचे ), Bharti Kharote
वरई साबुदाणा रोल (उपवासाचे )by Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

वरई साबुदाणा रोल (उपवासाचे ) recipe

वरई साबुदाणा रोल (उपवासाचे ) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Varai Sabudana Roll Recipe in Marathi )

 • वरई एक वाटी
 • साबुदाणा अर्धी वाटी
 • शेंगदाणे कूट अर्धी वाटी
 • एक ऊकडलेला बटाटा
 • 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • अर्धी वाटी कोथंबीर बारीक चिरून
 • पाव चमचा मीठ जीरे पूड
 • तळण्यासाठी तेल
 • ताक

वरई साबुदाणा रोल (उपवासाचे ) | How to make Varai Sabudana Roll Recipe in Marathi

 1. प्रथम वरई साबुदाणा भाजून घ्या
 2. आता मिक्सर मधून बारीक वाटून घ्या त्याच पिठ तयार करा. .
 3. त्यात मीठ आणि ताक घालून गोळा मळून घ्या. .
 4. 15 मी.तसेच झाकून ठेवा. .
 5. तोपर्यंत स्टफींग साठी बटाटा कुसकरून घ्या त्यात बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या कोथंबीर जीरे पूड मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .
 6. आता त्याचे छोटे गोळे बनवा. .
 7. आता भिजवलेल्या पीठाचा ऊंडा बनवून त्यात हे स्टफींग भरा. .
 8. आता त्याचे रोल बनवा. .
 9. पॅन मध्ये तेल तापत ठेवा त्यात हे रोल मंद आचे वर डीप फ्राय करून घ्या. .
 10. दोन्ही बाजूंनी चांगले खरफूस तळून घ्या. .
 11. आणि शेंगदाणा चटणी सोबत टिफीन ला दया. ..

My Tip:

स्टफींग साठी ड्रायफ्रूटस पण वापरू शकता. .

Reviews for Varai Sabudana Roll Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती