पत्ताकोबीचे पराठे | Cabbage Paratha Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cabbage Paratha recipe in Marathi,पत्ताकोबीचे पराठे, Archana Chaudhari
पत्ताकोबीचे पराठेby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

पत्ताकोबीचे पराठे recipe

पत्ताकोबीचे पराठे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cabbage Paratha Recipe in Marathi )

 • पत्ताकोबी १कप (किसून घेतलेला)
 • गव्हाचे पीठ २ कप
 • हरभरा डाळीचे पीठ १/२ कप
 • लसूण ३ पाकळ्या
 • हिरवी मिरची २
 • हळद १ टीस्पून
 • तीळ २टीस्पून
 • मीठ चवीनुसार

पत्ताकोबीचे पराठे | How to make Cabbage Paratha Recipe in Marathi

 1. लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक वाटावी.
 2. परातीमध्ये किसलेला पत्ताकोबी, गव्हाचे पीठ,हरभरा डाळीचे पीठ, वरील लसूण मिरचीचे वाटण,हळद,तीळ,मीठ टाकून घट्ट भिजून घ्या.
 3. पाणी शक्यतो कमीच वापरा, मिठाला पाणी सुटेल.
 4. तयार कणकेचे लहान लहान गोळे करून घ्या.
 5. वरील गोळ्यांचे पराठे बनवून घ्या.
 6. तव्यावर तेल टाकून छान भाजून घ्या.

My Tip:

कोथिंबीर, ओवा टाकू शकता.

Reviews for Cabbage Paratha Recipe in Marathi (0)