तिरंगा खिचडी | Tiranga khichadi Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tiranga khichadi recipe in Marathi,तिरंगा खिचडी, priya Asawa
तिरंगा खिचडीby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

तिरंगा खिचडी recipe

तिरंगा खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tiranga khichadi Recipe in Marathi )

 • ### रेड खिचडी
 • भिजवलेला शाबूदाना 2 वाटी
 • शेंगदाण्याचे कुट 1 वाटी
 • लाल तिखट 1/2 चमचा
 • चांगला तुप व जीरे फोडणी साठी
 • मीठ चवीनुसार
 • ### व्हाइट खिचडी
 • भिजवलेला शाबूदाना 2 वाटी
 • शेंगदाण्याचे कुट 1 वाटी
 • कैरी किसुन घेतलेली 3 चमचे
 • हिरवी मिरची ची पेस्ट 1/2 चमचा
 • चांगला तुप व जीरे फोडणी साठी
 • मीठ चवीनुसार
 • ### ग्रीन खिचडी
 • भिजवलेला शाबूदाना 2 वाटी
 • शेंगदाण्याचे कुट 1 वाटी
 • कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता मिक्सर मधुन बारीक काढलेला 4 चमचे
 • चांगला तुप व जीरे फोडणी साठी
 • मीठ चवीनुसार

तिरंगा खिचडी | How to make Tiranga khichadi Recipe in Marathi

 1. ### रेड खिचडी
 2. एका बाऊल मध्ये शाबूदाना, शेंगदाण्याचे कुट, लाल तिखट व मीठ टाकून मिक्स करून घ्या
 3. तुप गरम करून जीरे टाकून फोडणी द्या व मिक्स केलेला शाबूदाना टाकून चांगले परतुन घ्या
 4. रेड खिचडी तयार
 5. ### व्हाइट खिचडी
 6. एका बाऊल मध्ये शाबूदाना, शेंगदाण्याचे कुट, कैरी चे किस, व मीठ टाकून मिक्स करून घ्या
 7. तुप गरम करून जीरे व हिरवी मिरची टाकून फोडणी द्या व मिक्स केलेला शाबूदाना टाकून चांगले परतुन घ्या
 8. व्हाईट खिचडी तयार
 9. ### ग्रीन खिचडी
 10. एका बाऊल मध्ये शाबूदाना, शेंगदाण्याचे कुट, मिक्सर मधुन काढलेली पेस्ट व मीठ घालून मिक्स करून घ्या
 11. तूप गरम करून जीरे टाकून फोडणी द्या व मिक्स केलेला शाबूदाना टाकून चांगले परतुन घ्या
 12. ग्रीन खिचडी तयार

My Tip:

ग्रीन खिचडी करताना मिक्सरमधून पेस्ट काढल्याबरोबर करावी खूप वेळ काढलेली पेस्ट वापरू नये कारण टेस्ट व कलर मध्ये फरक पडतो

Reviews for Tiranga khichadi Recipe in Marathi (0)