मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा वडा

Photo of Sogo vada by Teju Auti at BetterButter
1018
3
0.0(0)
0

साबुदाणा वडा

Jul-23-2018
Teju Auti
300 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा वडा कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप साबुदाणे
  2. २ मोठे बटाटे उकडून
  3. ५-६ तिखट हिरव्या मिरच्या
  4. १/४ कप चिरलेली कोथिंबीर
  5. १/२ टिस्पून जीरे
  6. १/२ कप शेंगदाण्याचा कूट
  7. १/२ लिंबाचा रस
  8. चवीपुरते मीठ
  9. वडे तळण्यासाठी तेल

सूचना

  1. साबुदाणे पाण्यात भिजवावे. उरलेले पाणी काढून टाकावे. झाकण ठेवून ४ ते ५ तास भिजत ठेवावेत.
  2. शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
  3. मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.
  4. शेंगदाणे भाजून त्याची साले काढावीत आणि मिक्सरवर भरडसर बारीक करावेत.
  5. भिजवलेले साबुदाणे, बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
  6. भिजवलेल्या मिश्राणाचे छोटे गोळे तयार करावेत
  7. कढईत तेल गरम करावे आणि मीडियम हाय गॅस वर गोल्डन ब्राउन तळावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर