मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडा भुर्जी विद रोटी

Photo of Anda/ Egg Bhurji with Roti by Renu Chandratre at BetterButter
0
4
0(0)
0

अंडा भुर्जी विद रोटी

Jul-24-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा भुर्जी विद रोटी कृती बद्दल

चटपटीत , झटपट , चविष्ट, हेल्दी प्रथिनांनी भरपूर अंड्याची भुर्जी आणि पोळी , आजचा टिफिन

रेसपी टैग

 • सोपी
 • डिनर पार्टी
 • इंडियन
 • सिमरिंग
 • व्हिस्कीन्ग
 • सौटेइंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. अंडी 6
 2. बारीक चिरलेला कांदा १-२
 3. बारीक चिरलेला टोमॅटो २-३
 4. बारीक चिरलेला लसूण १ चमचा
 5. बारीक चिरलेला / किसलेला अदरक १ चमचा
 6. मीठ चवीनूसार
 7. हळद २ चिमूट
 8. लाल तिखट चवीनुसार
 9. काळी मिरी पावडर १/२ - १ चमचा
 10. तेल १ मोठा चमचा
 11. जीरे १ चमचा
 12. हिरवी मिरची चे तुकडे १-२ चमचे

सूचना

 1. सर्वप्रथम अंडी फोडून एका भांड्यात घ्या , त्यात हिरवी मिरची आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करावे
 2. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण, अदरक, हिरवी मिरची एकत्र ठेवा
 3. कढईत तेल गरम करून त्यात जीरे घाला , वर बारीक चिरलेला कांदा आणि लसूण टाकून , खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावे
 4. यात हळद तिखट आणि धणे पूड घालावी , मिक्स करावे
 5. आता यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि अदरक घालून तेल सुटे पर्यंत परतावे
 6. आता यात फोडून ठेवलेले अंडी घालावे
 7. मंद आचेवर, हळू हळू मिक्स करावे
 8. मिश्रण घट्ट होत जाईल ,
 9. ४-५ मिनीटे , अधून मधून मिक्स करावे , शेवटी कोथिंबीर घालावी आणि अंडा भुर्जी तयार आहे
 10. पोळी पराठा बरोबर टिफिन साठी पॅक करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर