पौष्टिक नाचणी रॅप | Poushtik nachani wrap Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Poushtik nachani wrap recipe in Marathi,पौष्टिक नाचणी रॅप, Shilpa Deshmukh
पौष्टिक नाचणी रॅपby Shilpa Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

पौष्टिक नाचणी रॅप recipe

पौष्टिक नाचणी रॅप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Poushtik nachani wrap Recipe in Marathi )

 • नाचणी पीठ 1 कप
 • तांदूळ पीठ 1/2 कप
 • किसलेला गाजर 1/4 कप
 • भिजलेली मूग डाळ 1/4 कप
 • पालकाची पाने 10
 • कांदा 1 बारीक चिरून
 • हिरव्या मिरच्या 3 बारीक चिरून
 • लिंबाचा रस 1 tbs
 • साखर 1 tbs
 • मीठ
 • तेल 2 tbs
 • तेल 1 tbs ￰तडक्यासाठी
 • तीळ 1 tbs
 • मोहरी 1 tbs
 • हिंग 1 tbs
 • कडीपत्ता 1 tbs

पौष्टिक नाचणी रॅप | How to make Poushtik nachani wrap Recipe in Marathi

 1. एक कप पाणी गरम करा त्यामध्ये मीठ टाका पाण्याला उकळी आली कि हळूहळू नाचणी पीठ मिक्स करा.
 2. लगेच तांदूळ पीठ पण मिक्स करा
 3. पीठ एकजीव झाले कि गॅस बंद करा आणि हि दोन्ही पीठ छान चुरून घ्या
 4. मळताना हाताला तेल लावा म्हणजे गरम लागणार नाही .
 5. मुगाची डाळ मिक्सरला छान स्मूथ वाटून घ्या .
 6. आता एका बाऊलमध्ये वाटलेली डाळ ,गाजर ,कांदा ,हिरवी मिरची ,साखर ,लिंबाचा रस मिक्स करा .
 7. आता पीठ आणि पालकाची पाने धुवून कोरडी करून घ्या .
 8. अशी पोळी लाटायची आणि पाने ठेवायची
 9. पिठाची जाडसर पोळी लाटा त्यावर पालकाची पाने ठेवा पाने अशाप्रकारे ठेवायची जेणेकरून पोळी पूर्णपणे झाकली जाईल .
 10. आता पालकांवर जे आपण डाळीचं आणि इतर साहित्याचं मिश्रण बनवलं ते पसरवा
 11. आता पोळीचा रोल बनवा आणि वीस मिनिट वाफवून घ्या .
 12. वाफवलेल्या रोलचे सुरीने तुकडे करा .
 13. आता तडका पॅनमध्ये तेल￰ गरम करा मोहरी हिंग ,कडीपत्ता आणि तीळ टाकून तडका तयार करा
 14. आणि रोलच्या तुकड्यावर तडका टाका.
 15. अशा प्रकारे नाचणी रॅप तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता

Reviews for Poushtik nachani wrap Recipe in Marathi (0)