मुख्यपृष्ठ / पाककृती / पिझ्झा सँडविच

Photo of Pizza Sandwich by Sujata Hande-Parab at BetterButter
550
8
0.0(0)
0

पिझ्झा सँडविच

Jul-24-2018
Sujata Hande-Parab
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिझ्झा सँडविच कृती बद्दल

पिझ्झा सँडविच हा अगदी वेगळा प्रकार आहे. ब्रेडवर पिझ्झा टॉपिंग्स,सॉस, किसलेले मोझ्झरेला चीज किंवा प्रोसिस्ज्ड चीज वापरून त्याला कव्हर करून टोस्ट केलेला हा प्रकार अतिशय स्वादिष्ट लागतो. लहान मुलांच्या डब्याला अतिशय उत्तम असा पर्याय आहे. मुले सहसा भाज्या खाण्यास टाळाटाळ करतात. असा प्रकारे भाज्याही त्यांना मिळतात आणि ती आवडीने खातात. आपल्या आवडीप्रमाणे भाज्या किंवा नॉनव्हेज ऍड करून हि बनावट येतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • फ्युजन
  • रोस्टिंग
  • ग्रीलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. टॉपिंगसाठी - बेबी कॉर्न - 2-3 पातळ काप करून घेतलेले
  2. हिरवी शिमला मिरची - ¼ कप बारीक कापलेली
  3. सँडविच -ब्राउन पाव किंवा ब्रेड - 3-4
  4. बटर - 1-2 चमचे.
  5. पिझ्झा सॉस – 1-2 टेबलस्पून ब्रेडला लावण्यासाठी + १/२ टेबलस्पून टॉपिंगला लावण्यासाठी 
  6. लाल तिखट फ्लेक्स - ½ टीस्पून
  7. काळी मिरी पावडर - 1/2 टीस्पून 
  8. ओरेगॅनो - 1 टीस्पून

सूचना

  1. एका प्लेट मध्ये पातळ काप केलेले बेबी कॉर्न्स आणि शिमला मिरची घेऊन त्यात पिझ्झा सॉस मिक्स करून त्या व्यवस्तिथ कोट करून घ्या.
  2. ब्रेडच्या जाड कडा कापून घ्या. त्यावर बटर लावून घ्या.
  3. १/२ टीस्पून किंवा थोडा पिझ्झा सॉस घेऊन सगळ्या ब्रेडवर व्यवस्तिथ पसरवून घ्या.
  4. त्यावर पिझ्झा सॉस कोटेड भाज्यांची टॉपिंग टाका. थोडीच टाका.
  5. एका प्लेट मध्ये ओरेगॅनो आणि काळीमिरी मिक्स करून घ्या. ती त्या टॉपिंगवर पसरावा.
  6. थोडे लाल तिखट फ्लेक्स पसरवून घ्या. थोडे थोडे टाका.
  7. किसलेले मोझंझरेला चीज ने व्यवस्तिथ वरचा भाग झाकून घ्या.
  8. त्यावर बटर लावलेला दुसरा ब्रेडचा तुकडा ठेवा आणि सँडविच मेकर मध्ये ग्रिल करून घ्या.
  9. २ मिनिटांनी दुसऱ्या बाजूला परतून घेऊन परत २ मिनिटे किंवा क्रिस्पी होईपर्यंत ग्रिल करून घ्या.
  10. कापून गरम करम सर्व्ह करा किंवा टिफिन मध्ये भरून द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर