BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरी-भात

Photo of Raw Mango Rice by Sanika SN at BetterButter
252
4
0(0)
0

कैरी-भात

Jul-24-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी-भात कृती बद्दल

झटपट व चविष्ट कैरी भात

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 4

 1. २ वाट्या शिजवलेला भात (शिळा भात असेल तरी चालेल)
 2. १ वाटी कैरीचा कीस (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण कमी-जास्तं घ्यावे)
 3. २ हिरव्या मिरच्या चिरून
 4. २-३ लाल सुक्या मिरच्या
 5. कढीपत्ता
 6. १ टीस्पून मोहरी
 7. १ टीस्पून चणाडाळ
 8. १ टीस्पून उडदाची डाळ
 9. १/४ टीस्पून मेथीदाणे
 10. १/४ टीस्पून हिंग
 11. १ टीस्पून हळद
 12. १ टेस्पून काजू (तुम्ही शेंगदाणे ही वापरु शकता)
 13. मीठ चवीनुसार
 14. खोबरेल तेल (रोजचे वापरातले तेल घेतले तरी चालेल)

सूचना

 1. भांड्यात खोबरेल तेल गरम करून मोहरी, मेथ्या, डाळी व हिंगाची फोडणी करावी.
 2. डाळी लालसर परतल्या गेल्या की त्यात हिरव्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता व काजू घालून परतून घ्यावे.
 3. आता त्यात हळद घालून वरून शिजवलेला भात घालावा व मिक्स करावे.
 4. आता त्यात कैरीचा कीस, मीठ घालून हलके मिक्स करुन घ्यावे.
 5. झाकण ठेवून एक वाफ काढावी.
 6. हा भात तुम्ही लोणचं, पापड किंवा रस्समसोबत सर्व्ह करु शकता.
 7. आधी करुन ठेवला तर कैरीचा स्वाद छान मुरेल.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर