Photo of Masalebhaat by Sanika SN at BetterButter
469
3
0.0(0)
0

मसालेभात

Jul-24-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसालेभात कृती बद्दल

पारंपारिक व पाैष्टिक मसालेभात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. दीड वाट्या बासमती तांदूळ धुवून, १५-२० मिनिटे निथळत ठेवावे
  2. १ वाटी उभी चिरलेली तोंडली
  3. १/२ वाटी मटारचे दाणे
  4. १/२ वाटी खवलेले ओले खोबरे
  5. १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. २ टेस्पून आले+लसूणची भरडसर पेस्ट
  7. १/४ वाटी काजू पाकळ्या
  8. १ टीस्पून मोहरी
  9. ५-६ कढीपत्ता
  10. १/२ टीस्पून साखर
  11. १/४ टीस्पून हींग
  12. मीठ चवीनुसार
  13. मसाला साहित्य:
  14. ३ लाल सुक्या मिरच्या
  15. दालचिनीची काडी तोडून
  16. १ मसाला वेलची
  17. २-३ लवंगा
  18. १ टेस्पून पांढरे तीळ
  19. १ टेस्पून सुके खोबरे
  20. १ टीस्पून जीरे

सूचना

  1. एका पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करून त्यात मसालेभातासाठी लागणार्‍या मसाल्याचे साहित्य घालून मंद आचेवर ३-४ मिनिटे परतावे.
  2. खमंग भाजावे पण करपवू नये.
  3. थंड झाले की मिक्सरमधून बारीक पूड वाटून घ्यावी.
  4. जाड बुडाच्या पातेल्यात २ टेस्पून तेल गरम करुन मोहरी, हिंग व कढिपत्त्याची फोडणी करावी.
  5. त्यात आले+लसूण पेस्ट घालून चांगली परतावी.
  6. आता त्यात काजू पाकळी घालून हलक्या सोनेरी रंगावर परतणे.
  7. त्यात मटार, तोंडली व निथळत ठेवलेला तांदूळ घालून एकत्र करावे.
  8. चवीनुसार मीठ, वाटलेला मसाला घालून एकत्र करावे.
  9. त्यात ३ वाट्या उकळते पाणी घालावे व उकळी आणावी.
  10. उकळी आली की त्यात साखर घालून, गॅस मंद करुन , झाकून ८-१० मिनिटे शिजवावे
  11. मसालेभातावर ओले खोबरे व कोथींबीर घालून सजावट करावी.
  12. साजूक तूप घालून मसालेभात गरम सर्व्ह करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर