स्ट्फ्ड ब्रॉकोली पराठे | Stuffed Broccoli Paratha Recipe in Marathi

प्रेषक Sanika SN  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuffed Broccoli Paratha recipe in Marathi,स्ट्फ्ड ब्रॉकोली पराठे, Sanika SN
स्ट्फ्ड ब्रॉकोली पराठेby Sanika SN
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Stuffed Broccoli Paratha Recipe in Marathi

स्ट्फ्ड ब्रॉकोली पराठे recipe

स्ट्फ्ड ब्रॉकोली पराठे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed Broccoli Paratha Recipe in Marathi )

 • नेहमीप्रमाणे पोळ्याचे/ चपात्यांचे कणिक जसे तेल, मीठ घालून भिजवून घेतो तसे भिजवून घेणे.
 • छोटा गड्डा ब्रॉकोली - फक्त तुरे किसून घेणे
 • १ टेस्पून किसलेले आले
 • १ टेस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची
 • १ टेस्पून भाजलेली जीरेपूड
 • १ टेस्पून धणेपूड
 • १ टेस्पून अनारदाना पावडर (तुम्ही आमचूर पावडर ही वापरु शकता)
 • मीठ चवीप्रमाणे
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • पराठ्यांना वरुन लावायाला तूप / बटर

स्ट्फ्ड ब्रॉकोली पराठे | How to make Stuffed Broccoli Paratha Recipe in Marathi

 1. भांड्यात तेल गरम करून त्यात आले व हिरवी मिरची परतून घ्या.
 2. त्यात ब्रॉकोलीचा कीस घालून एकत्र करुन घ्या.
 3. जीरेपूड, धणेपूड व अनारदाना पावडर घालून एकत्र करून, झाकून एक-दोन वाफा काढून घ्या.
 4. त्यात बारीक चिरलेली कोथींबीर व मीठ घालून पुन्हा २-३ मिनिटे शिजवा. मिश्रण जरा गार होऊ द्या.
 5. कणकेचा जरा लिंबापेक्षा मोठा गोळा घेऊन, छोटी पुरी लाटून घ्या.
 6. त्यात ब्रॉकोलीचे सारण भरुन सर्वं बाजूंनी बंद करून हलक्या हाताने गोल पराठा लाटावा.
 7. पराठा जरा जाडसरच लाटावा.
 8. नॉन-स्टीक तव्यावर पराठा तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा.
 9. लाकडी उलथण्याने हलके दाबून सगळीकडून नीट शेकावे.
 10. गरम- गरम ब्रॉकोली पराठा रायता, आंब्याच्या लोणच्याबरोबर सर्व्ह करा.  

Reviews for Stuffed Broccoli Paratha Recipe in Marathi (0)