मुगाची भाजी | Mung Ki Sabji / Whole Mung Veg Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mung Ki Sabji / Whole Mung Veg recipe in Marathi,मुगाची भाजी, Renu Chandratre
मुगाची भाजीby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  2

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

मुगाची भाजी recipe

मुगाची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mung Ki Sabji / Whole Mung Veg Recipe in Marathi )

 • भिजलेले मूग २-३ वाटी
 • तेल १ मोठा चमचा
 • मोहरी १/२ चमचा
 • जीरे १/२ चमचा
 • हिंग १-२ चिमूट
 • हळद पावडर १/२ चमचा
 • लाल तिखट १ चमचा
 • धणे पूड १ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • कढी पत्ता
 • गरम मसाला १/४ चमचा
 • बारीक चिरलेला कांदा १
 • बारीक चिरलेला टोमॅटो १-२
 • लसूण ठेचलेले १-२ चमचे
 • हिरवी मिरची चे तुकडे १-२ चमचे
 • कोथिंबीर सजावटी साठी

मुगाची भाजी | How to make Mung Ki Sabji / Whole Mung Veg Recipe in Marathi

 1. मूग धुवून १-२ तास भिजवून ठेवावे
 2. मुगात थोडे पाणी , मीठ आणि हळद घालून , २-३ शिटी प्रेशर कुक करून घ्या
 3. कांदा, टोमॅटो , लसूण , हिरवी मिरची चिरून घ्या
 4. कुकर मधे तेल गरम करा , मोहरी, जीरे आणि कढी पत्ते टाका
 5. बारीक चिरलेला कांदा आणि ठेचलेले लसूण घाला
 6. खरपूस परतून घ्यावे
 7. टोमॅटो , हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला आणि धणे पूड टाकून परतावे
 8. शिजलेली अख्खी मूग घाला, थोडे पाणी आणि चवीपुरते मीठ घालावे
 9. मिक्स करावे आणि कुकरच झाकण लावून , एक शिटी घ्या
 10. शेवटी कोथिंबीर घाला आणि अख्खी मूगाची मारवाडी पद्धतीची भाजी तयार आहे
 11. पोळी पराठा पुरी सोबत टिफिन साठी पॅक करावे

My Tip:

मूग रात्री भिजत ठेवले तर घाईच्या वेळी सोपे जाते

Reviews for Mung Ki Sabji / Whole Mung Veg Recipe in Marathi (0)