पनीर पुलाव | Panir Pulav Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Panir Pulav recipe in Marathi,पनीर पुलाव, Aarya Paradkar
पनीर पुलावby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

पनीर पुलाव recipe

पनीर पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Panir Pulav Recipe in Marathi )

 • 1 1/2 वाटी बासमती तांदुळ
 • पाव किलो पनीर
 • 2-3 तमाल पत्र
 • 7-8 मीरे
 • 4-5 लवंगा
 • 2 मसाला वेलची
 • 4 साधी वेलची
 • 1/2 चमचा जीरे
 • 3 बारीक चिरलेला कांदा
 • 2 बारीक चिरलेला टोमॅटो
 • 2 चमचे पुलाव मसाला
 • मीठ चवीनुसार
 • 1/2 वाटी तेल

पनीर पुलाव | How to make Panir Pulav Recipe in Marathi

 1. तांदूळ धुवून 1/2 तास निथळत ठेवणे
 2. नंतर तांदूळ बोट चेपा शिजवून घ्यावा
 3. जास्त शिजवू नये
 4. पनीरचे तुकडे करून तळून घ्यावे
 5. 2 कांदे उभे चिरून तळून घ्यावे
 6. उरलेल्या तेलात सर्व खडा मसाला घालून परतणे
 7. त्यात एक बारीक चिरलेला कांदा टोमॅटो परतून घ्यावे व पुलाव मसाला घालून चांगले परतून घ्यावे ,1/2 ग्लास पाणी घालुन थोडी ग्रेव्ही करणे
 8. त्यात शिजवलेला भात घालून चांगले परतून घ्यावे
 9. नंतर मीठ, पनीर, तळलेला कांदा घालून चांगले परतून एक दणकुन वाफ आणावी
 10. वरून कोथिंबीर घालावी
 11. रायता बरोबर सर्व्ह करावे

My Tip:

कांदा टोमॅटो काकडी कोशिंबीर / दही बुंदी रायता पण छान पर्याय आहे

Reviews for Panir Pulav Recipe in Marathi (0)