मुख्यपृष्ठ / पाककृती / लोबीया मसाला / चवळी मसाला

Photo of Lobiya Masala / Chavali curry by Renu Chandratre at BetterButter
1012
6
0.0(0)
0

लोबीया मसाला / चवळी मसाला

Jul-24-2018
Renu Chandratre
2 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लोबीया मसाला / चवळी मसाला कृती बद्दल

चवळीची चविष्ट मसाला करी , पोळी पराठा भाकरी सोबत टिफिन साठी उत्तम पर्याय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • नॉर्थ इंडियन
  • सिमरिंग
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. चवळी १-२ वाटी
  2. कांदे २
  3. टोमॅटो ३-४
  4. लसूण पाकळी ५-८
  5. अदरक तुकडा १
  6. हिरवी मिरची १-२
  7. तेल १-२ मोठा चमचा
  8. मोहरी १/२ चमचा
  9. जीरे १ चमचा
  10. हळद, मीठ, तिखट चवीनुसार
  11. किचन किंग मसाला / गरम मसाला १ चमचा

सूचना

  1. चवळी धुवून , १-२ तास पाण्याचे भिजवून ठेवा
  2. नंतर त्यात थोडी हळद आणि मीठ घालावे
  3. कुकर मधे ३-४ शिटी काढाव्यात
  4. एका मिक्सर च्या भांड्यात कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची आणि अद्रक घ्या
  5. बारीक वाटण तयार करा
  6. कढईत तेल गरम करावे , मोहरी जीरे टाका
  7. हळद घालून , लगेच तयार वाटण टाका
  8. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यावा
  9. मसाला परतत असताना त्यात लाल तिखट आणि किचन किंग मसाला पण परतून घ्यावे
  10. अता ह्यात उकळलेले चवळी मिक्स करा
  11. चवीनुसार थोडे मीठ घालावे , गरजेनुसार थोडे पाणी घालून मिक्स करावे
  12. झाकून ५ मिनिटे शिजवा
  13. कोथिंबीर घालावी आणि पोळी पराठा पुरी किंवा भाकरी सोबत टिफिन पॅक करावे , तयार आहे लोबीया मसाला करी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर