बटाटे वडा | Batate vada Recipe in Marathi

प्रेषक safiya abdurrahman khan  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Batate vada recipe in Marathi,बटाटे वडा, safiya abdurrahman khan
बटाटे वडाby safiya abdurrahman khan
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

बटाटे वडा recipe

बटाटे वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batate vada Recipe in Marathi )

 • अर्धा किलो बटाटे
 • दोन मोठे कांदा
 • दोन चमचे आलं-लसूण बारीक वाटून
 • दोन चमचे मिरची बारीक वाटून
 • एक चमचा लाल तिखट
 • दोन टेबलस्पून लिंबूरस
 • दहा ते बारा कढीपत्त्याची पानं
 • दोन चमचे तेल
 • चवीनुसार मीठ
 • दोन हरभरा डाळीचं ताजं पीठ
 • अर्धा वाटी हिरा बेसन
 • चिमुटभर हळद
 • मीठ
 • भिजवायला कोमट पाणी

बटाटे वडा | How to make Batate vada Recipe in Marathi

 1. बटाटे उकडून कुस्करून घ्या.कांदा बारीक चिरा,कढाईत दोन चमचे तेल टाका .
 2. मोहरी , हिंग , हळद टाका .  कढीपत्ता टाका.कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परत, नंतर वाटलेलं आलं-लसूण , मिरची टाका . 
 3. कुस्करलेला बटाटा परता .मीठ , लिंबूरस टाका.भाजी खमंग झाली की गैस बंद करा
 4. मिश्रण गार होऊ दया, डाळीच्या पिठात मीठ , हळद टाका , कोमट पाण्यानं भिजवा. फार घट्ट किंवा फार सैल नको .
 5. आता वरील गार झालेल्या मिश्रणाचे चपटे गोल करा, पीठ बुडवून तळा, सोनेरी रंग येऊ दया, चटणीबरोबर सर्व्हा करा.

Reviews for Batate vada Recipe in Marathi (0)