मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या पानांचे थालिपीठ

Photo of Shevgyachya Pananche Thalipith by Vaishali Joshi at BetterButter
0
4
0(0)
0

शेवग्याच्या पानांचे थालिपीठ

Jul-25-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या पानांचे थालिपीठ कृती बद्दल

शेवग्याच्या शेंगा नेहमीच खाल्ल्या जातात , पण त्याची पाने पण खूप पौष्टिक असतात .त्याचे साइड इफेक्ट्स काहिही नसतात शिवाय हयात कैलशीयम प्रचूर मात्रेत आहे .याच्या नियमित सेवनाने अनेक रोग आपोआप दूर होतात , म्हणतात की मृत्यु सोडून प्रत्येक रोग याच्या सेवनाने दूर होण्याची क्षमता आहे , ५ कप दुधात जेवढे कैल्शियम मिळत ते एक कप पानात असत , लहान मुलांना तसेच गरोदर स्र्तियांना अत्यंत पोषक .मग इतके फायदे आहेत आणि इझिली मिळू शकणार असेल तर ? कराव्यात की याच्या पासून वेगवेगळया रेसिपीज .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

 1. शेवग्या ची पाने २ कप
 2. कांदा १
 3. टोमेटो १
 4. मिरच्या २
 5. कणिक १ १/२ कप
 6. तांदळा चे पीठ १/४ कप
 7. बेसन २ चमचे
 8. तिखट
 9. हळद
 10. मीठ
 11. धणे पावडर
 12. जीरे पावडर
 13. लिंबू रस

सूचना

 1. पाने दांडी पासून ओढून काढून आणि धुवून घ्यावीत कांदा बारीक़ , टोमेटो , मिरच्या चिरुन घ्या ,
 2. कणिक , तांदुळा चे पीठ आणि बेसन एकत्र करा त्यात कांदा , टोमेटो ,मिरच्या ,ही पाने ( न चीरता ),तिखट, हळद , मीठ ,लिंबू रस ,धने जीरे पावडर , ३-४ चमचे तेल घालून मिक्स करा .पाणी घालून भिजवून ५-६ मिनिट ठेवा .
 3. तयार पिठाचे छोटे गोळे करुन ठेवा
 4. तवा तापत ठेवा आणि थालीपीठ थापा , तेल साइड ने तेल सोडून दोन्ही कडून शिजवून घ्या
 5. बस पौष्टिक आणि वेगळ्या चवीचे थालीपीठ तयार फ़ॉइल मधे रैप करुन टिफिनमधे भरायला रेडी .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर