खान्देशी पद्धतीचे वांग्याचे भरीत | Khandeshi Style Baingan Bharta Recipe in Marathi

प्रेषक Sanika SN  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khandeshi Style Baingan Bharta recipe in Marathi,खान्देशी पद्धतीचे वांग्याचे भरीत, Sanika SN
खान्देशी पद्धतीचे वांग्याचे भरीतby Sanika SN
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Khandeshi Style Baingan Bharta Recipe in Marathi

खान्देशी पद्धतीचे वांग्याचे भरीत recipe

खान्देशी पद्धतीचे वांग्याचे भरीत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khandeshi Style Baingan Bharta Recipe in Marathi )

 • मोठे भरीताचं वांगं (खान्देशात हिरवी वांगी मिळतात ती या भरीतासाठी वापरली जातात.)
 • २-३ हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) 
 • २-३ लसूण (लसूण आणी हिरव्या मिरच्या कोरडेच तव्यावर भाजून घ्यायच)
 • मुठभर कोथंबीर
 • मुठभर कांद्याची पात चिरून
 • १ टीस्पून ओवा
 • १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे
 • मीठ चवीनुसार

खान्देशी पद्धतीचे वांग्याचे भरीत | How to make Khandeshi Style Baingan Bharta Recipe in Marathi

 1. प्रथम वांग्याला सुरीने चिरा पाडून , जरासा तेलाचा हात लावून गॅसवर खरपूस भाजून घ्यावे.
 2. वांग्याची सालं काढून घ्यावी.
 3. खान्देशात लोकं लाकडी बडगी- मुसळी वापरतात, त्यात किंवा खल-बत्त्यात कोथिंबीर, कांद्याची पात, लसूण, हिरव्या मिरच्या  व शेंगदाणे एकत्र ठेचून घ्यावे.
 4. हा ठेचा वांग्याच्या गरात घालून एकजीव करावा.
 5. कढईत जरा जास्त तेल तापवून ओव्याची फोडणी करावी.
 6. भरीत त्यात घालून व्यवस्थित एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालावे व २ मिनीटे शिजवून गॅस बंद करावा.
 7. टिपिकल जळगावकडचं भरीत तयार आहे.
 8. भाकर्‍यांसोबत सर्व्ह करावे.
 9. तोंडीलावायला मी चिरलेला कांदा व जवसाची चटणी वाढलीय

Reviews for Khandeshi Style Baingan Bharta Recipe in Marathi (0)