मुख्यपृष्ठ / पाककृती / खान्देशी पद्धतीचे वांग्याचे भरीत

Photo of Khandeshi Style Baingan Bharta by Sanika SN at BetterButter
1303
4
0.0(0)
0

खान्देशी पद्धतीचे वांग्याचे भरीत

Jul-25-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खान्देशी पद्धतीचे वांग्याचे भरीत कृती बद्दल

सोपी, पारंपारिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मोठे भरीताचं वांगं (खान्देशात हिरवी वांगी मिळतात ती या भरीतासाठी वापरली जातात.)
  2. २-३ हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) 
  3. २-३ लसूण (लसूण आणी हिरव्या मिरच्या कोरडेच तव्यावर भाजून घ्यायच)
  4. मुठभर कोथंबीर
  5. मुठभर कांद्याची पात चिरून
  6. १ टीस्पून ओवा
  7. १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम वांग्याला सुरीने चिरा पाडून , जरासा तेलाचा हात लावून गॅसवर खरपूस भाजून घ्यावे.
  2. वांग्याची सालं काढून घ्यावी.
  3. खान्देशात लोकं लाकडी बडगी- मुसळी वापरतात, त्यात किंवा खल-बत्त्यात कोथिंबीर, कांद्याची पात, लसूण, हिरव्या मिरच्या  व शेंगदाणे एकत्र ठेचून घ्यावे.
  4. हा ठेचा वांग्याच्या गरात घालून एकजीव करावा.
  5. कढईत जरा जास्त तेल तापवून ओव्याची फोडणी करावी.
  6. भरीत त्यात घालून व्यवस्थित एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालावे व २ मिनीटे शिजवून गॅस बंद करावा.
  7. टिपिकल जळगावकडचं भरीत तयार आहे.
  8. भाकर्‍यांसोबत सर्व्ह करावे.
  9. तोंडीलावायला मी चिरलेला कांदा व जवसाची चटणी वाढलीय

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर