व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस | Vegetable - Egg Fried Rice Recipe in Marathi

प्रेषक Sanika SN  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vegetable - Egg Fried Rice recipe in Marathi,व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस, Sanika SN
व्हेजिटेबल - एग फ्राईड राईसby Sanika SN
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस recipe

व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vegetable - Egg Fried Rice Recipe in Marathi )

 • दीड वाट्या बासमती तांदळाचा मोकळा शिजवलेला भात
 • ३-४ अंडी फेटून घेतलेली
 • १ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी
 • १ वाटी पातळ उभा चिरलेला गाजर
 • १ वाटी पातळ उभी चिरलेली भोपळी मिर्ची
 • १/२ वाटी बारीक चिरलेली फरसबी
 • १/२ कप कांद्याची पात चिरुन
 • पातीचे कांदे उभे चिरुन
 • १/२ टेस्पून आले
 • १ टेस्पून लसूण
 • दीड टेबलस्पून सोया सॉस
 • दीड टेबलस्पून हॉट चिली सॉस (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
 • १ टेबलस्पून स्वीट चिली सॉस
 • १ टीस्पून पांढरी मिरपूड (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
 • मीठ लागेल तसे
 • तेल

व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस | How to make Vegetable - Egg Fried Rice Recipe in Marathi

 1. प्रथम नॉन-स्टीक पॅनमध्ये फेटलेली अंडी घालून चमच्याने सतत हलवत रहावे.
 2. जसे जसे अंडी शिजू लागतील तसे ते गोळा होऊ लागेल. (स्क्रॅम्बल्ड एगप्रमाणे)
 3. अंडी पूर्ण शिजली की बाजूला काढून ठेवावी.
 4. त्याच पॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे व त्यात बारीक चिरलेले आले + लसूण चांगले परतवून घ्यावे.
 5. त्यात चिरलेला पातीचा कांदा व फरसबी घालून ४-५ मिनिटे परतावे.
 6. आता त्यात चिरलेला कोबी व भोपळी मिरची घालावी. आच मध्यम असावी.
 7. सगळ्यात शेवटी चिरलेला गाजर व कांद्याची पात घालावे व ३-४ मिनिटे परतावे.
 8. सगळ्या भाज्यांचा थोडा करकरीतपणा (क्रंचीनेस) असला पाहिजे.
 9. आता त्यात सोया सॉस, हॉट चिली सॉस, स्वीट चिली सॉस व पांढरी मिरपूड घालून सगळे एकत्र करावे.
 10. चव घेऊन बघावे, लागले तरचं मीठ घालावे, सगळ्या सॉसमध्ये मीठ असते.(भातात ही शिजवताना मीठ घातले होते)
 11. आता त्यात शिजवलेली अंडी व शिजवलेला भात घालून नीट मिक्स करावे.
 12. सगळ्या भाताला सॉस व भाज्या नीट लागल्या पाहीजे.
 13. झाकून एक वाफ काढावी.
 14. गरमा-गरम व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे.

Reviews for Vegetable - Egg Fried Rice Recipe in Marathi (0)