हैद्राबादी बिर्याणी | Hyderabadi biryani Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Hyderabadi biryani recipe in Marathi,हैद्राबादी बिर्याणी, Pranali Deshmukh
हैद्राबादी बिर्याणीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

हैद्राबादी बिर्याणी recipe

हैद्राबादी बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Hyderabadi biryani Recipe in Marathi )

 • बासमती तांदूळ 1 वाटी
 • पालक 1/2 पाव फक्त पाने
 • कोथिंबीर 1/4 कप
 • हिरव्या मिरच्या 3
 • टमाटर 2
 • कांदा 1
 • तेजपान 1
 • दालचिनी 1 इंच
 • बडी इलायची 1
 • हिरवी वेलची 2
 • काजू 10
 • बदाम 10
 • मनुके 10-15
 • तिखट 1/2 tbs
 • हळद 1/2 tbs
 • मीठ
 • तेल 2 डाव

हैद्राबादी बिर्याणी | How to make Hyderabadi biryani Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य जमवून घ्या.पालकाची पाने तोडून धुवून घ्या.
 2. तांदूळ धुवून 70% वाफवून घ्या. वाफवतांना एक चमचा तूप घाला म्हणजे दाणे मोकळे राहतील .आणि झारुन सोकत ठेवा .
 3. कांदा ,टमाटर ,मिरची यांचे मोठाले तुकडे करा आणि पॅनमध्ये एक चमचा तेल घालून फक्त पाच मिनिट हे परतवून घ्या .
 4. आपल्याला शिजवायचं नाही हे लक्षात ठेवा.
 5. थोडे नरम झाले कि सर्व मिक्सरला फिरवून स्मूथ पेस्ट बनवा .
 6. पॅनमध्ये एक डावभर तेल घाला तेल तापलं कि दालचिनी ,तेजपान ,वेलची ,काजू ,बदाम मनुके तेलात परतवून घ्या.
 7. आता पालकाची पेस्ट ऍड करा .आणिचमच्याने सारखे हलवत राहा .जेव्हा थोडं तेल सुटायला येईल तेव्हा तिखट आणि मीठ घाला.
 8. एक दोन मिनिट परतवून झालं कि शिजवलेला भात घाला छान मिक्स करा .आणिदहा मिनिट झाकण ठेवून वाफ काढा.
 9. भाताला पालकाची ,कोथिंबीर ,कांदा ,टमाटर याची अप्रतिम चव येते .
 10. सलाड बरोबर मस्त बिर्याणी टिफिनमध्ये द्या .

Reviews for Hyderabadi biryani Recipe in Marathi (0)