मुख्यपृष्ठ / पाककृती / शेपूचे धिरडे आणि चण्याची उसळ

Photo of Shepuche dhirade aani chanyachi usal by Pranali Deshmukh at BetterButter
754
5
0.0(0)
0

शेपूचे धिरडे आणि चण्याची उसळ

Jul-25-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेपूचे धिरडे आणि चण्याची उसळ कृती बद्दल

खूप खूप चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे मोठी काय मुलंही टिफिन फस्त करतील .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेपूची भाजी 1 कप चिरून
  2. कणिक 1 कप
  3. तांदूळ पीठ 2 tbs
  4. हिरव्या मिरच्या 2
  5. खोबरं 1 तुकडा छोटा
  6. जिरे 1 tbs
  7. साखर 1 tbs
  8. लिंबाचा रस 1 tbs
  9. काळे चणे 1 वाटी
  10. कांदा धणेपूड आणि टमाटर पेस्ट 1/2 कप
  11. अद्रक लसूण पेस्ट 1 tbs
  12. तिखट 1 tbs
  13. हळद 1/2 tbs
  14. मीठ
  15. गरम मसाला 1 tbs
  16. तेल 2 tbs

सूचना

  1. शेपू ,खोबरं ,मिरच्या जिरे थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्या
  2. एका बाऊलमध्ये कणिक तांदूळपिठ ,आणि मिक्सरला फिरवलेली शेपू मिक्स करा
  3. त्यामध्ये लिंबाचा रस साखर मीठ आणि पाणी घालून धिरड्याच्या पिठाप्रमाणे भिजवा .
  4. नॉनस्टिक तव्यावर जरा तेल सोडून हे बॅटर पळीने टाका .
  5. थोडा गोल आकार द्यायचा प्रयत्न करा.
  6. दोन्ही बाजूने तेल सोडून भाजून घ्या .
  7. शेपूचे धिरडे तयार तुम्ही नुसतं लोणचे किंवा चटणीबरोबर पण देऊ शकता .
  8. पण एखादी उसळ जर दिली तर आरोग्यासाठी लाभदायी राहील
  9. चणे रात्रभर पाण्यात भिजत घाला
  10. सकाळी पाणी झारुन घ्या
  11. कुकरमध्ये तेल टाकून कांदा टमाटर पेस्ट अद्रक लसूण पेस्ट परतवा
  12. तिखट हळद मीठ गरम मसाला घाला
  13. भिजलेले चणे घाला
  14. 1 ग्लास पाणी घालून तीन ते चार शिट्या काढा
  15. टिफिनमध्ये धिरडे आणि चणे त्यावर बारीक कांदा टमाटर घालून द्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर