कोबी मंचुरीयन | Kobi manchurian Recipe in Marathi

प्रेषक safiya abdurrahman khan  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kobi manchurian recipe in Marathi,कोबी मंचुरीयन, safiya abdurrahman khan
कोबी मंचुरीयनby safiya abdurrahman khan
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

0

कोबी मंचुरीयन recipe

कोबी मंचुरीयन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kobi manchurian Recipe in Marathi )

 • मंचुरीयन बॉलसाठी:
 • किसलेला कोबी 1.5 कीलो
 • भोपणी मिरची 1/2 कप
 • मैदा 1/2 कप
 • ३ टेस्पून कॉर्न स्टार्च
 • हिरवी चटणी 1 टीस्पून
 • आलंलसूण पेस्ट 1 टीस्पून
 • मिठ 1.5 टीस्पुन
 • तळण्यासाठी तेल
 • मंचुरीयन सॉससाठी:
 • ३ हिरव्या मिरच्या
 • 1 टीस्पून किसलेले आले
 • 4-5 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून
 • 1 टेस्पून कॉर्न स्टार्च
 • 2 टिस्पून तेल
 • 2 टेस्पून सोयासॉस
 • 1 टेस्पून व्हिनेगर
 • 1 टिस्पून साखर
 • मीठ चवीपूरते
 • 1/2कप पाती कांदयाच्या पाती बारीक चिरून

कोबी मंचुरीयन | How to make Kobi manchurian Recipe in Marathi

 1. सर्वात आधी मंचुरीयन बॉल्स बनवून घ्यावे. कसल्ला कोबी चवीप्रमाणे मिठ चोळावे, हिरवी चटणी घालावी. नंतर त्यात आलेलसूण पेस्ट,कॉर्न स्टार्च ,मैदा घालावा. व्यवस्थित मिक्स करावे. मिश्रण घट्ट आणि चिकटसर झाले पाहिजे.
 2. कढईत तेल गरम करावे. तेल व्यवस्थित तापले कि कालवलेल्या मिश्रणाचे सुपारीएवढे बोंडे तेलात सोडावे. चांगले ब्राऊन रंगाचे होईस्तोवर तळावे.
 3. फ्राईंग पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करावे. त्यात चिरलेली मिरची, चिरलेली लसूण-आले घालावे.
 4. 2 मिनीट परतून भोपळीमिरची, थोडी साखर घालावी, मग सोयासॉस घालावा.
 5. 2 चमचा कॉर्न स्टार्च अर्धी वाटी पाण्यात गुठळ्या न होता मिक्स करून ठेवावे.
 6. नंतर त्यात मीठ, व्हिनेगर घालून ढवळावे. चव बघून काही कमी असेल तर ते घालून सॉस तयार करा
 7. मंद आचेवर सॉसमध्ये तयार बॉल्स घालावे, निट मिक्स करावे. गार्निशिंगसाठी थोडा बारीक चिरलेला पाती कांदा घालावी.

Reviews for Kobi manchurian Recipe in Marathi (0)