दुधी कोफ्ता करी | Bottlegourd Kofta Curry Recipe in Marathi

प्रेषक Sanika SN  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bottlegourd Kofta Curry recipe in Marathi,दुधी कोफ्ता करी, Sanika SN
दुधी कोफ्ता करीby Sanika SN
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Bottlegourd Kofta Curry Recipe in Marathi

दुधी कोफ्ता करी recipe

दुधी कोफ्ता करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bottlegourd Kofta Curry Recipe in Marathi )

 • १ कोवळा दुधी
 • २ टोमॅटो बारीक चिरलेले
 • १ कांदा बारीक चिरलेला
 • ३-१/२ टेस्पून बेसन
 • २-३ लसूण पाकळ्या
 • आल्याचा छोटा तुकडा
 • १/२ हिरवी मिरची
 • १/२ टीस्पून जीरे
 • १ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची
 • १-१/२ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी - जास्त)
 • १ टेस्पून धणेपूड
 • १ टेस्पून पंजाबी गरम - मसाला (नसल्यास रोजचा गरम - मसाला वापरावा)
 • मीठ चवीनुसार
 • १ टीस्पून कसूरीमेथी
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • तेल

दुधी कोफ्ता करी | How to make Bottlegourd Kofta Curry Recipe in Marathi

 1. प्रथम दुधीचे साल काढून किसून घ्या.
 2. हलकेच पिळून रस काढून घ्या.
 3. दुधीच्या किसात आता बेसन, थोडा गरम - मसाला, थोडे लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ घालून कोफ्ते तयार करून घ्या.
 4. तुम्ही कोफ्ते डीप फ्राय करु शकता, मी आप्पेपात्रात कमी तेलात तळून घेतले आहे.
 5. मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, कांदा, आले + लसूण, मिरचीचा तुकडा आणी काजू घाला.
 6. थोडेच पाणी घालून मुलायम वाटून घ्या.
 7. कढईत तेल गरम करा व जीर्‍याची फोडणी करा.
 8. त्यात वाटलेला मसाला घालून चांगला परतून घ्या
 9. त्यात आता उरलेले लाल तिखट, गरम - मसाला, धणेपूड, मीठ, कसूरीमेथी चुरडून घाला व तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
 10. त्यात थोडे पाणी घालून १०-१५ मिनिटे मंद गॅसवर शिजू द्या.( ग्रेव्ही कितपत दाट / पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला.)
 11. सर्व्ह करायच्या ५ मिनिटे आधी गरम ग्रेव्हीत तयार कोफ्ते घाला. 
 12. खूप आधीपासून घातले तर कोफ्ते मऊ होऊन फुटू शकतात.
 13. वरून कोथिंबीर पेरा व नान, रोटीबरोबर दुधी कोफ्ता करी सर्व्ह करा

Reviews for Bottlegourd Kofta Curry Recipe in Marathi (0)