मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी कोफ्ता करी

Photo of Bottlegourd Kofta Curry by Sanika SN at BetterButter
518
3
0.0(0)
0

दुधी कोफ्ता करी

Jul-25-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी कोफ्ता करी कृती बद्दल

दुधीची चविष्ट व करी

रेसपी टैग

  • व्हेज
  • नॉर्थ इंडियन
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कोवळा दुधी
  2. २ टोमॅटो बारीक चिरलेले
  3. १ कांदा बारीक चिरलेला
  4. ३-१/२ टेस्पून बेसन
  5. २-३ लसूण पाकळ्या
  6. आल्याचा छोटा तुकडा
  7. १/२ हिरवी मिरची
  8. १/२ टीस्पून जीरे
  9. १ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची
  10. १-१/२ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी - जास्त)
  11. १ टेस्पून धणेपूड
  12. १ टेस्पून पंजाबी गरम - मसाला (नसल्यास रोजचा गरम - मसाला वापरावा)
  13. मीठ चवीनुसार
  14. १ टीस्पून कसूरीमेथी
  15. बारीक चिरलेली कोथिंबीर
  16. तेल

सूचना

  1. प्रथम दुधीचे साल काढून किसून घ्या.
  2. हलकेच पिळून रस काढून घ्या.
  3. दुधीच्या किसात आता बेसन, थोडा गरम - मसाला, थोडे लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ घालून कोफ्ते तयार करून घ्या.
  4. तुम्ही कोफ्ते डीप फ्राय करु शकता, मी आप्पेपात्रात कमी तेलात तळून घेतले आहे.
  5. मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, कांदा, आले + लसूण, मिरचीचा तुकडा आणी काजू घाला.
  6. थोडेच पाणी घालून मुलायम वाटून घ्या.
  7. कढईत तेल गरम करा व जीर्‍याची फोडणी करा.
  8. त्यात वाटलेला मसाला घालून चांगला परतून घ्या
  9. त्यात आता उरलेले लाल तिखट, गरम - मसाला, धणेपूड, मीठ, कसूरीमेथी चुरडून घाला व तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
  10. त्यात थोडे पाणी घालून १०-१५ मिनिटे मंद गॅसवर शिजू द्या.( ग्रेव्ही कितपत दाट / पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला.)
  11. सर्व्ह करायच्या ५ मिनिटे आधी गरम ग्रेव्हीत तयार कोफ्ते घाला. 
  12. खूप आधीपासून घातले तर कोफ्ते मऊ होऊन फुटू शकतात.
  13. वरून कोथिंबीर पेरा व नान, रोटीबरोबर दुधी कोफ्ता करी सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर