मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्रॅगनफ्रूट पॅनकेक

Photo of Dragon fruit Pancake by Sujata Hande-Parab at BetterButter
855
7
0.0(0)
0

ड्रॅगनफ्रूट पॅनकेक

Jul-25-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्रॅगनफ्रूट पॅनकेक कृती बद्दल

अतिशय चविष्ट आणि पटकन होणारी हि रेसिपी मी ड्रॅगनफ्रूट रस आणि मैदा वापरून केली आहे. त्याला फुलवण्यासाठी मी बेकिंग पावडर आणि सोडा चा वापर केला आहे. फ्लेवर साठी ड्रॅगनफ्रूट रस वापरला आहे. विविध प्रकारच्या फळांबरोबर आणि मधाबरोबर सर्व्ह केला आहे. टिफिन मध्ये लहान मुलांना आवडेल अशी हि डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • अमेरीकन
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • व्हिस्कीन्ग
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तेल - २-३ टेबलस्पून तळण्यासाठी
  2. पीठी साखर - 3 - ४ टेबलस्पून आपल्या चवीनुसार कमी जास्त करा
  3. ड्रॅगनफ्रूट पल्प किंवा घट्ट रस – 3/4 कप
  4. दूध - १ - १ १/२ कप
  5. कॉर्न फ्लोर सफेद - १/४ कप
  6. मैदा - १ कप
  7. बेकिंग पावडर - १/२ टीस्पून
  8. बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा - १/२ टीस्पून
  9. सजावटीसाठी आणि सर्व्ह करण्यासाठी - मध - २-३ टेबलस्पून
  10. चेरीस - १ टेबलस्पून बारीक कापलेली 
  11. डाळिंबाचे दाणे - १-२ टेबलस्पून
  12. बारीक तुकडे केलेला ड्रॅगनफ्रूट – १/४ कप 
  13. केळ्याचे पातळ काप

सूचना

  1. एका वाडग्यात मैदा, कॉर्न फ्लोर, खाण्याचा सोडा आणि बेकिंग पूड चाळून घ्या.
  2. त्यात ड्रॅगनफ्रूट रस आणि दूध घालून हळू हळू ढवळून घ्या. मिश्रण जास्त पातळ करू नये
  3. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात एक वाटी चमचा ड्रॅगनफ्रूट पीठ मिश्रण गोलाकार घाला. आच पीठ टाकताना मध्यम जास्त असू द्या. नंतर लगेचच तो मंद मध्यम ठेवा. नाही तर पॅनकेक करपतील
  4. काही सेकंदांनी थोडे थोडे बुडबुडे पॅनकेक वर येतील आणि त्याच्या बाजू सुटू लागतील. तेव्हा तो परतून घ्या.
  5. दुसरी बाजू १ मिनिटे भाजून घ्या. काढून प्लेट वर ठेवा. असा प्रकारे सगळे पॅनकेक करून घ्या.
  6. सर्व्ह करताना वरून ड्रॅगनफ्रूट, केळ्याचे पातळ काप, डाळिंबाचे दाणे, मध आणि चेरीस घालून सर्व्ह करा किंवा टिफिन मध्ये घालून द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर