पंचधान्य धपाटा | PANCHDHANYA dhapata Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  25th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • PANCHDHANYA dhapata recipe in Marathi,पंचधान्य धपाटा, Chayya Bari
पंचधान्य धपाटाby Chayya Bari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

1

पंचधान्य धपाटा recipe

पंचधान्य धपाटा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PANCHDHANYA dhapata Recipe in Marathi )

  • पंचधान्य भाजणी पीठ 3 वाट्या
  • ओवा 1 चमचा
  • तीळ 1 चमचा
  • तिखट 2 चमचे
  • हळद 1 चमचा
  • धने जिरे पूड प्रत्येकी 1/2 चमचा
  • पालक,मेथी,कोथिंबीर यापैकी एक बारीक चिरून 1 वाटी
  • तेल 1/4वाटी
  • मीठ चवीनुसार

पंचधान्य धपाटा | How to make PANCHDHANYA dhapata Recipe in Marathi

  1. प्रथम पंचधान्य पीठ घ्यावे ह्ये पीठ ज्वारी, बाजरी,तांदूळ प्रत्येकी 1 वाटी,गहू व हरबरा डाळ प्रत्येकी 1/2वाटी ह्या प्रमाणात घेऊन छान भाजून दळून आणावे
  2. त्यात ओवा,तीळ,तिखट,मीठ,हळद व पालक ,मेथी किंवा कोथिंबीर घालून घट्ट मळावे
  3. मग गोळा घेऊन छान मळून हलक्या हाताने लाटून तापलेल्या तव्यावर टाकावा बाजूने तेल सोडावे मध्ये छिद्र पाडून त्यात तेल सोडावे
  4. पलटी करून परत तेल सोडावे व दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे
  5. याप्रमाणे धपाटे करून टिफिन चटनी बरोबर पॅक करावा जोडीला शिऱ्यासारखं गोड काहीतरी असावे

My Tip:

आणखी मुगडाळ,उडीद डाळ घालू शकता

Reviews for PANCHDHANYA dhapata Recipe in Marathi (1)

Renu Chandratre4 months ago

सुंदर
Reply