झुणका चटई समोसा-एक फ्युजन | ZUNAKA chatai samosa-ek fusion Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  25th Jul 2018  |  
1 from 1 review Rate It!
 • ZUNAKA chatai samosa-ek fusion recipe in Marathi,झुणका चटई समोसा-एक फ्युजन, Chayya Bari
झुणका चटई समोसा-एक फ्युजनby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

11

1

झुणका चटई समोसा-एक फ्युजन recipe

झुणका चटई समोसा-एक फ्युजन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make ZUNAKA chatai samosa-ek fusion Recipe in Marathi )

 • मैदा 2 वाट्या
 • ओवा 1 चमचा
 • मीठ चवीला
 • गरम तेल 2 चमचे मोहन
 • STuffing साठी
 • पालक 1 वाटी
 • मेथीची पाने 1 वाटी
 • कांदा 1
 • आले लसूण पेस्ट 1 चमचा
 • हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
 • हळद 1 चमचा
 • मीठ चवीला
 • जिरे,हिंग फोडणीसाठी
 • बेसन 1/2वाटी
 • ज्वारीचे पीठ 2,3 चमचे
 • तेल झुणक्यासाठी 4,5 चमचे
 • तळण्यासाठी तेल 200 ग्राम

झुणका चटई समोसा-एक फ्युजन | How to make ZUNAKA chatai samosa-ek fusion Recipe in Marathi

 1. प्रथम मैदा ओवा मीठ व गरम तेलाचे मोहन घालून मध्यम भिजवून झाकून ठेवावे
 2. आता तेल तापवून जिरे हिंग घालावे मग कांदा परतून आले लसूण पेस्ट घालावी मग हिरवी मिरची पेस्ट छान परतून हळद मीठ घालावे
 3. मग पालक मेथी घालून मिक्स करावे पाणी सुटते त्यात बेसन व ज्वारीचे पीठ घालून मिक्स करावे बारीक गॅसवर वाफ घ्यावी
 4. कडा सुटू लागल्या कि झुणका तयार
 5. आता मैद्याच्या 2 आयताकृती पट्ट्या लाटून एकावर एक ठेवाव्या व त्यावर झुणक्याचा सारण ठेवावे
 6. आता 2 बाजू पाणी लावून झुणक्यावर चिट कवाव्या
 7. राहिलेल्या 2 बाजूवर सुरीने कटमारावे पट्ट्या तयार होतील त्या चटई प्रमाणे गुंफून समोसा तयार करावा
 8. याप्रमाणे सामोसे भरून घ्यावे
 9. आता तेल तापवून त्यात सामोसे सोडावे व सामोसे दोन्ही बाजूनी खरपूस तळावे
 10. तयार सामोसे सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावे

My Tip:

ह्यात झुणक्या ऐवजी इतरही stuffing करता येते

Reviews for ZUNAKA chatai samosa-ek fusion Recipe in Marathi (1)

Vidya Gurav2 months ago

मस्त बनवले आहे
Reply

Cooked it ? Share your Photo