Photo of Veg Hakka Noodles by Renu Chandratre at BetterButter
914
4
0.0(0)
0

Veg Hakka Noodles

Jul-26-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • चायनीज
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. एक पॅकेट हक्का नूडल्स
  2. उभा बारीक चिरलेला कांदा१
  3. उभा चिरलेला टोमॅटो १
  4. उभी चिरलेली कोबी १ मोठा चमचा
  5. उभी चिरलेली सिमला मिरची १
  6. पातीचा कांदा चिरलेला १/२ मोठा चमचा
  7. ठेचलेले लसूण १ चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. काळी मिरी पावडर १/२ - १ छोटा चमचा
  10. सोया सॉस १ मोठा चमचा
  11. ग्रीन चिली सौस गरजेनुसार

सूचना

  1. सर्वप्रथम एका कढईत ४-५ कप पाणी घ्या
  2. गरम करायला ठेवा आणि त्यात नूडल्स टाका
  3. उकळू द्या , अधून मधून हालवत राहा
  4. उकळी आली की गॅस बंद करा आणि ५ मिनीटे झाकून ठेवावे
  5. तोपर्यंत सर्व भाज्या चिरून घ्या
  6. आता नूडल्स च सर्व जास्ती च पाणी काढून टाका , आणि त्यांना थोडे तेल लावून द्या ( हे केल्याने ते आपसात चिटकत नाही)
  7. एका कढईत तेल गरम करावे, ठेचलेला लसूण आणि सर्व भाज्या , मोठ्या गॅस वर , ५ मिनिटे परतून घ्या
  8. त्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, चिली सौस , आणि सोया सौस घालून मिक्स करावे
  9. उकळून ठेवलेले नूडल्स घाला आणि ५ मिनिटे व्यवस्थित मिक्स करा
  10. व्हेज हक्का नूडल्स तयार आहे, मुलांच्या टिफिन मध्ये पॅक करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर