अख्या मुगाच्या एडण्या | Whole Moong Ednya Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Whole Moong Ednya recipe in Marathi,अख्या मुगाच्या एडण्या, Archana Chaudhari
अख्या मुगाच्या एडण्याby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

अख्या मुगाच्या एडण्या recipe

अख्या मुगाच्या एडण्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Whole Moong Ednya Recipe in Marathi )

 • अख्खे हिरवे मूग २ कप
 • हिरव्या मिरच्या ५
 • लसूण पाकळ्या ४
 • पालक १कप बारीक चिरलेला
 • बेसन पीठ १ टेबलस्पून
 • मीठ चवीनुसार
 • तेल वरून लावण्यासाठी

अख्या मुगाच्या एडण्या | How to make Whole Moong Ednya Recipe in Marathi

 1. अख्खे हिरवे मूग स्वछ धुवून १० तास पाण्यात भिजत ठेवा.पाणी जर जास्त टाका, मुगाला फुलण्यासाठी.
 2. १०तासांनंतर मूगातील पाणी काढून टाका.
 3. मिक्सर च्या भांड्यात भिजवलेले अख्खे मूग,हिरव्या मिरच्या, लसूण,पालक,मीठ आणि पाणी टाकून बारीक वाटून घ्या.
 4. एका भांड्यात वरील वाटण काढून घ्या,आणि त्यात बेसन पीठ टाकून चांगले एकत्र करुन घ्या.
 5. नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा.
 6. आता २ टेबलस्पून वरील मुगाचे मिश्रण टाका, हळूहळू पसरवा आणि तेल टाका.
 7. दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. थोडे तेल सोडा.
 8. गरम गरम एडण्या दही,सॉस सोबत सर्व्ह करा.
 9. लोणचे,चटणी सोबतही छान लागते.....

My Tip:

तुम्ही यात कोथिंबीर घालून करू शकता.

Reviews for Whole Moong Ednya Recipe in Marathi (0)