फ्लॉवर बटाटा भाजी | FLOWER batata bhaji Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • FLOWER batata bhaji recipe in Marathi,फ्लॉवर बटाटा भाजी, Minal Sardeshpande
फ्लॉवर बटाटा भाजीby Minal Sardeshpande
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

9

0

फ्लॉवर बटाटा भाजी recipe

फ्लॉवर बटाटा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make FLOWER batata bhaji Recipe in Marathi )

  • अर्धा की फ्लॉवर
  • दोन मध्यम बटाटे
  • दोन टॉमेटो
  • पाव वाटी ओलं खोबरं
  • एक चमचा लाल तिखट
  • एक चमचा साखर
  • मीठ
  • तेल दोन टेबलस्पून
  • मोहोरी अर्धा चमचा
  • ओवा एक चमचा
  • हळद अर्धा चमचा
  • कांदे दोन
  • कांदा लसूण मसाला(ऐच्छिक)

फ्लॉवर बटाटा भाजी | How to make FLOWER batata bhaji Recipe in Marathi

  1. फ्लॉवर साफ करून तुरे काढून मीठ घातलेल्या कोमट पाण्यात ठेवा.
  2. बटाटे सोलून आवडीप्रमाणे चिरा, पाण्यात टाका.
  3. टॉमेटो बिया काढून चिरा.
  4. कांदे सोलून चिरा.
  5. कढईत तेल तापवा.
  6. मोहोरी घाला, ती तडतडली की ओवा घाला.
  7. आता कांदा घालून परता.
  8. परतला की बटाटा घाला. परता आणि पाच मीनीट मंद गॅसवर झाकण ठेवून वाफ येऊद्या.
  9. आता हळद, तिखट घाला. परता.
  10. थोडं मीठ घालून परता.
  11. फ्लॉवर चे तुरे घाला.परतून झाकण ठेवा.
  12. पाच मिनिटं ठेवून चवीनुसार मीठ, साखर घाला, टॉमेटो घाला.
  13. एक वाफ काढा.
  14. आवडत असेल तर कांदा लसूण मसाला घालून परता.
  15. ओलं खोबरं घाला.
  16. पोळीसोबत सर्व्ह करा.

Reviews for FLOWER batata bhaji Recipe in Marathi (0)