शाही गट्टा पोटली सब्जी | Shahi gatta potali sabzi Recipe in Marathi

प्रेषक Garima Yadav  |  26th Jul 2018  |  
3 from 1 review Rate It!
 • Shahi gatta potali sabzi recipe in Marathi,शाही गट्टा पोटली सब्जी, Garima Yadav
शाही गट्टा पोटली सब्जीby Garima Yadav
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

1

शाही गट्टा पोटली सब्जी recipe

शाही गट्टा पोटली सब्जी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shahi gatta potali sabzi Recipe in Marathi )

 • गट्टे चा पीठ तयार करण्यासाठी सामग्री-
 • बेसन 1 कप
 • तेल 1 टेबलस्पून
 • मीठ 1/2 टीस्पून
 • लाल तिखट 1/2 टीस्पून
 • हळद 1/2 टीस्पून
 • जिरे 1 टीस्पून
 • ओवा 1 टीस्पून
 • गरम मसाला 1/4 टीस्पून
 • कसूरी मेथी 1 टीस्पून
 • दही 4 टेबलस्पून
 • हींग - 1 चिमूट
 • गट्टेच्या स्टफिंग साठी सामग्री-
 • खवा 1/2 कप
 • काजू 1 टेबलस्पून (चिरलेला)
 • मनुका 10-12
 • केशर 6-7 धागे
 • बारीक चिरलेले हिरवी मिरची 1 टीस्पून
 • मीठ 1/4 टीस्पून
 • बारीक चिरलेले कोथिंबीर 1 टेबलस्पून
 • पोटली तळण्यासाठी तेल
 • ग्रेव्ही साठी सामग्री-
 • तेल 3 टेबलस्पून
 • दही 1 कप
 • आलं-लसूण-कांदा पेस्ट 1/2 कप
 • जीरे 1 टीस्पून
 • हिंग 1 चिमुटभर
 • तमालपत्र 1-2
 • लाल तिखट 1 टीस्पून
 • धने पावडर 1 टीस्पून
 • हळद 1/2 टीस्पून
 • गरम मसाला 1/2 टीस्पून
 • चवीनुसार मीठ
 • कसूरी मेथी 2 टेबलस्पून
 • बेसन 1 टेबलस्पून
 • कोथिंबीर सजविण्यासाठी

शाही गट्टा पोटली सब्जी | How to make Shahi gatta potali sabzi Recipe in Marathi

 1. गट्टाच्या पीठ तयार करण्यासाठी स्टेप्स-
 2. एका वाडग्यात बेसन, तेल, लाल तिखट, मीठ, हळद, दही, जीरे,हींग, कसूरी मेथी, ओवा आणि गरम मसाला घालून मऊ पीठ मळून घ्यावे कोरडा वाटन असेल तर पाणी घालावे.
 3. झाकून 15 मिनिटे ठेवावे.
 4. स्टफिंग तयार करण्यासाठी स्टेप्स-
 5. खोवा चांगला चुरून घ्यावे व त्यामध्ये काजू, मनुका, मीठ, केशर, हिरव्या मिरची आणि कोथिंबीर घालून, मिसळून घ्यावे,स्टफिंग तयार आहे.
 6. पोटली तयार करण्यासाठी स्टेप्स-
 7. आपल्या हाताला तेल लावून, तयार पीठाचे 8 भाग करून गोळे बनवून घ्यावे.
 8. तयार गोळे हातात पूरी सारखे करून, त्यामध्ये स्टफिंग मिश्रण भरावे त्यानंतर त्यांना पोटली चा आकार द्यावे.
 9. या प्रमाणे सर्व पोटली तयार करावे.
 10. पोटली उकळण्यासाठी पाणी ठेवावे, पाणी उकळल्या नंतर त्यामध्ये पोटली 15-20 मिनिटे उकळावे.
 11. पोटली ठंड करावे व तळून काढावे,नाही पोटली तयार आहे.
 12. ग्रेव्ही तयार करण्यासाठी स्टेप्स-
 13. तेल गरम करून त्यामध्ये जीरे, हींग व तमाल पत्र घालावे.
 14. त्यानंतर आलं-लसूण-कांदा पेस्ट घालावे.
 15. या मध्ये लाल तिखट,धने पूड, हळद, गरम मसाला आणि 1 कप पाणी घालून, शिजवून घ्यावे.
 16. त्यानंतर बेसन व कसूरी मेथी घालून 2-3 मिनिटे शिजवावे व दही घालून उकळ येईपर्यंत सतत हलवत रहावे.
 17. ग्रेव्ही खूप जाड वाटल्यास त्यामध्ये गट्टे उकळलेला थोडा पाणी घालावे.
 18. चवीनुसार मीठ घालून,पोटली घालावे व 5-6 मिनिटे शिजवावे.
 19. शेवटी कोथिंबीर शिंपडून,शाही गट्टा पोटली सब्जी तयार आहे, चपाती व भाता बरोबर सर्व करावे.

Reviews for Shahi gatta potali sabzi Recipe in Marathi (1)

supriya padave (krupa rane)4 months ago

Chaan
Reply

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती