काकडीकोबीचे थालीपीठ | Cucumber Cabbage Thalipith Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cucumber Cabbage Thalipith recipe in Marathi,काकडीकोबीचे थालीपीठ, Shraddha Juwatkar
काकडीकोबीचे थालीपीठby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Cucumber Cabbage Thalipith Recipe in Marathi

काकडीकोबीचे थालीपीठ recipe

काकडीकोबीचे थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cucumber Cabbage Thalipith Recipe in Marathi )

 • 2 काकडी किसलेली व एक वाटी कोबी किसून
 • 1 वाटी गव्हाचे पीठ
 • 1 वाटी तांदुळाचे पीठ
 • अर्धी वाटी बेसन
 • 1 टेबलस्पून धने जिरे पूड व लाल तिखट
 • अर्धा चमचा हळद व गरम मसाला पावडर
 • 1 चमचा लिंबाचा रस
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • थोडा ओवा तीळ व चवीनुसार मीठ

काकडीकोबीचे थालीपीठ | How to make Cucumber Cabbage Thalipith Recipe in Marathi

 1. एका परातीत किसलेली काकडी घ्या पिळून पाणी काढू नये
 2. आता वरील दिल्याप्रमाणे सव॔ साहित्य काकडीचया किसात एकत्र करून मळून घेणे.
 3. पोळपाटाला प्लास्टिक पिशवी ठेवून त्या वर एक पिठाचा गोळा ठेवून पाण्याचा हात लावून गोल आकारात एकसारखे थापणे
 4. मध्यम आचेवर तवा गरम करत ठेवावा व थोडे तेल घालून थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेणे

My Tip:

भाजणीचे पीठ घरात असेल तर ते वापरावे

Reviews for Cucumber Cabbage Thalipith Recipe in Marathi (0)