पोहे ढोकळा | Poha Dhokla Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Poha Dhokla recipe in Marathi,पोहे ढोकळा, Shraddha Juwatkar
पोहे ढोकळाby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

पोहे ढोकळा recipe

पोहे ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Poha Dhokla Recipe in Marathi )

 • अर्धी वाटी पोहे
 • अर्धी वाटी रवा
 • एक वाटी घट्ट दही
 • हिरव्या मिरच्यांचा ठेचा
 • चवीनुसार मीठ
 • अर्धा चमचा इनो फ्रूट साल्ट
 • बारीक चिरलेली कोथिंबीर व तेल
 • अर्धा चमचा मोहरी जिरे कढीपत्ता हिरव्या मिरच्या व हिंग

पोहे ढोकळा | How to make Poha Dhokla Recipe in Marathi

 1. एका खोलगट आकाराच्या बाऊलमध्ये दही व एक कप पाणी एकत्र घेऊन चांगले मिक्स करावे
 2. मग त्यात रवा व पोहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा,चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
 3. हे मिश्रण एकजीव होण्यासाठी १०-१५ मिनिटे मुरण्यासाठी एका बाजूला ठेवा.
 4. हा पिठाचा ढोकळा उकडायला लावण्यापूर्वी त्यात फ्रूट सॉल्ट व दोन टेबलस्पून पाणी घाला व पिठातून बुडबुडे येऊ लागले की ढवळून घेऊन गोल पसरट भांड्याला आतून सगळीकडून तेलाचा हात लावून घेऊन त्या भांड्यात हे पीठ ओता.
 5. मग ते भांडे इडलीपात्रात ठेवा व १०-१५ मिनिटांनी ढोकळा तयार झाल्याची खात्री करून घेऊन इडलीपात्रातून बाहेर काढा व एका बाजूला ठेवा.
 6. दुसरीकडे गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घ्या व तेल चांगले गरम झाले की त्यात मोहरी जिरे कढीपत्ता व मिरच्या टाकून ती चांगले तडतडली की हिंग घालून मध्यम आचेवर एक मिनिट फोडणी परतून घ्या आणि नंतर ती फोडणी पॅनमध्ये तयार झालेल्या ढोकळ्यावर ओता.
 7. मस्त वड्या कापून कोथिंबिरीने सजावट करून सर्व्ह करा.

Reviews for Poha Dhokla Recipe in Marathi (0)