सोया तवा पुलाव | Soya Tawa Pulao Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Soya Tawa Pulao recipe in Marathi,सोया तवा पुलाव, samina shaikh
सोया तवा पुलावby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

0

0

सोया तवा पुलाव recipe

सोया तवा पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Soya Tawa Pulao Recipe in Marathi )

 • 4वाटी उकडलेला भात
 • 1वाटी सोया चग्स(गरम मिठाच्या पाण्यात सोक करुन पाणी काढलेले )
 • 1बटाटा (तळून)
 • 1वाटी मटर
 • 2हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
 • 1वाटी फ्लॉवर
 • दीड चमचा लाल तिखट
 • 1चमचा धने पुड
 • 1चमचा जिरे पुड
 • 1चमचा बडिशेप
 • मीठ (चवी नुसार)
 • कढिपत्ता
 • 1टोम्याटो(बारीक चिरून)
 • 1कांदा बारीक चिरून
 • 4चमचे बटर
 • 3चमचे तेल

सोया तवा पुलाव | How to make Soya Tawa Pulao Recipe in Marathi

 1. सोया चग्स व बटाटे तळून घ्या
 2. पातेल्यात तेल व बटर गरम करा
 3. त्यात बडिशेप व कढिपत्ता घाला
 4. आता कांदा मिरची घालून परतून घ्या
 5. टोम्याटो 1चमचा लाल तिखट धने जिरे पुड घाला
 6. सगळ्या भाज्या घालून छान मीक्स करा
 7. पाव भाजी मसाला घाला
 8. तळलेले बटाटे व सोया चग्स घाला परतून घ्या
 9. 5min झाकून वाफ येऊ द्या
 10. आता उकडलेला भात घाला
 11. छान मीक्स करा
 12. परत वरुन राहिलेला पाव भाजी मसाला व लाल तिखट पावडर घालून छान मीक्स करुन घ्या
 13. 3min छान परतून घ्या
 14. गरम गरम सर्व करा

My Tip:

यात शिळा भात वापरू शकता.गाजर शिमला मिरची ही घालू शकता

Reviews for Soya Tawa Pulao Recipe in Marathi (0)