साबुदाणा खिचडी | SABUDANA khichdi Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • SABUDANA khichdi recipe in Marathi,साबुदाणा खिचडी, Chayya Bari
साबुदाणा खिचडीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

साबुदाणा खिचडी recipe

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make SABUDANA khichdi Recipe in Marathi )

 • 3 तास भिजलेला साबुदाणा 1 वाटी
 • जाडसर शेंगदाणे कूट 1/2वाटी
 • हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
 • जिरे 1/2चमचा
 • उकडलेला बटाटा 1
 • मीठ चवीला
 • शेंगदाणे 2 चमचे
 • शेंगदाणा तेल 3 चमचे
 • लिंबाची फोड

साबुदाणा खिचडी | How to make SABUDANA khichdi Recipe in Marathi

 1. साबुदाणा 3 तास आधी धुवून भिजत ठेवावा
 2. शेंगदाणे मंद गॅसवर खमंग भाजून जाडसर कूट करावा उकडलेला बटाटा सोलून फोडी कराव्या
 3. 2 चमचे तेल तापवून जिरे तडतडावे मग शेंगदाणे टाकून ते परतून घ्यावे
 4. आता हिरवी मिरची पेस्ट टाकून परतावे मग बटाट्याच्या फोडी व मीठ टाकून मिक्स करावे
 5. आता भिजलेला साबुदाणा घालून मिक्स करावे झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ घ्यावी आता हलवून कूट घालून मिक्स करावे
 6. बारीक गॅसवर वाफ घ्यावी हलवून परत एक वाफ घ्यावी
 7. गॅस बंद करावा 2 मिनिटाने परत हलवून घ्यावी
 8. पुन्हा एकदा खिचडी हलवावी म्हणजे मऊ पण मोकळी होत्ये खिचडीची ढेप होत नाही
 9. तयार खिचडी टिफिनला पॅक करावी बरोबर लिंबाची फोड द्यावी

My Tip:

गॅस बंद केल्यावर 2,3 मिनिटाच्या अंतराने खिचडी 2 वेळा हलवावी म्हणजे ढेप होत नाही

Reviews for SABUDANA khichdi Recipe in Marathi (0)