मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा खिचडी

Photo of SABUDANA khichdi by Chayya Bari at BetterButter
0
8
0(0)
0

साबुदाणा खिचडी

Jul-26-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा खिचडी कृती बद्दल

आईला उपवास कि मुलांना भाजी पोळी चा कंटाळा मग टिफिनला आवर्जून मागणी होत्ये साबुदाणा खिचडीची त्यासाठीच बनवली हि खमंग साबुदाणा खिचडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 3 तास भिजलेला साबुदाणा 1 वाटी
  2. जाडसर शेंगदाणे कूट 1/2वाटी
  3. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  4. जिरे 1/2चमचा
  5. उकडलेला बटाटा 1
  6. मीठ चवीला
  7. शेंगदाणे 2 चमचे
  8. शेंगदाणा तेल 3 चमचे
  9. लिंबाची फोड

सूचना

  1. साबुदाणा 3 तास आधी धुवून भिजत ठेवावा
  2. शेंगदाणे मंद गॅसवर खमंग भाजून जाडसर कूट करावा उकडलेला बटाटा सोलून फोडी कराव्या
  3. 2 चमचे तेल तापवून जिरे तडतडावे मग शेंगदाणे टाकून ते परतून घ्यावे
  4. आता हिरवी मिरची पेस्ट टाकून परतावे मग बटाट्याच्या फोडी व मीठ टाकून मिक्स करावे
  5. आता भिजलेला साबुदाणा घालून मिक्स करावे झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ घ्यावी आता हलवून कूट घालून मिक्स करावे
  6. बारीक गॅसवर वाफ घ्यावी हलवून परत एक वाफ घ्यावी
  7. गॅस बंद करावा 2 मिनिटाने परत हलवून घ्यावी
  8. पुन्हा एकदा खिचडी हलवावी म्हणजे मऊ पण मोकळी होत्ये खिचडीची ढेप होत नाही
  9. तयार खिचडी टिफिनला पॅक करावी बरोबर लिंबाची फोड द्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर