ब्रेड डोसा | BREAD DOSA Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  27th Jul 2018  |  
1 from 1 review Rate It!
 • BREAD DOSA recipe in Marathi,ब्रेड डोसा, आदिती भावे
ब्रेड डोसाby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  9

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

1

ब्रेड डोसा recipe

ब्रेड डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BREAD DOSA Recipe in Marathi )

 • तांदूळ -5 वाट्या
 • चुरमुरे - 5 वाट्या
 • उडीद डाळ- 1 वाटी
 • मेथीचे दाणे - 2 चमचे
 • मीठ चवीनुसार
 • तेल गरजेनुसार
 • मैसुर चटणी- चणा डाळ 1 वाटी
 • उडीद डाळ - पाव वाटी
 • कांदा -1
 • लसूण -4,5 पाकळ्या
 • गूळ -छोटा खडा
 • आमचूर पावडर -1चमचा
 • मीठ चवीनुसार
 • सुकी मिरची 2
 • हिंग अर्धा चमचा
 • तिखट 1 चमचा
 • तेल -1 चमचा

ब्रेड डोसा | How to make BREAD DOSA Recipe in Marathi

 1. तांदूळ, उडीद डाळ, मेथीचे दाणे एकत्र धुवून घ्या. त्यात पाणी घालून 4 तास ठेवून द्या. 4 तासानंतर चुरमुरे।भिजवून घ्या. आता चुरमुरे , डाळ , तांदूळ सगळं एकत्र करून बारीक वाटून घ्यावे. 4 ते 5 तास ठेवून द्यावे. मग मीठ व लागेल तसे पाणी घालून पीठ थोडंस नेहमीच्या डोश्याच्या पिठापेक्षा घट्ट असुद्या. तवा गरम करून त्यावर थोडे तेल घालून हे पीठ पळीने जास्त न पसरता ठेवून द्या. वर झाकण ठेवावे द्या. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या. मऊ छान bread डोसा तयार आहे. Tiffin मध्ये छान मऊ राहतो. मी मैसुर चटणी बरोबर आणि थोडं butter लावून देते. मैसुर चटणी -तेल गरम करून त्यात चणा डाळ , उडीद डाळ, कांदा , लसूण सुकी मिरची परतून घ्या. गार झाल्यावर तिखट, मीठ, गुळ घालून मिक्सरमध्ये गरजेनुसार पाणी बारीक करून घ्या.

Reviews for BREAD DOSA Recipe in Marathi (1)

Manasvi Pawar4 months ago

छान आहे रेसिपी मला नावावरून वाटलं ब्रेडचा डोसा.
Reply