Photo of BREAD DOSA by Aditi Bhave at BetterButter
570
4
0.0(1)
0

BREAD DOSA

Jul-27-2018
Aditi Bhave
540 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • कर्नाटक
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ -5 वाट्या
  2. चुरमुरे - 5 वाट्या
  3. उडीद डाळ- 1 वाटी
  4. मेथीचे दाणे - 2 चमचे
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल गरजेनुसार
  7. मैसुर चटणी- चणा डाळ 1 वाटी
  8. उडीद डाळ - पाव वाटी
  9. कांदा -1
  10. लसूण -4,5 पाकळ्या
  11. गूळ -छोटा खडा
  12. आमचूर पावडर -1चमचा
  13. मीठ चवीनुसार
  14. सुकी मिरची 2
  15. हिंग अर्धा चमचा
  16. तिखट 1 चमचा
  17. तेल -1 चमचा

सूचना

  1. तांदूळ, उडीद डाळ, मेथीचे दाणे एकत्र धुवून घ्या. त्यात पाणी घालून 4 तास ठेवून द्या. 4 तासानंतर चुरमुरे।भिजवून घ्या. आता चुरमुरे , डाळ , तांदूळ सगळं एकत्र करून बारीक वाटून घ्यावे. 4 ते 5 तास ठेवून द्यावे. मग मीठ व लागेल तसे पाणी घालून पीठ थोडंस नेहमीच्या डोश्याच्या पिठापेक्षा घट्ट असुद्या. तवा गरम करून त्यावर थोडे तेल घालून हे पीठ पळीने जास्त न पसरता ठेवून द्या. वर झाकण ठेवावे द्या. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या. मऊ छान bread डोसा तयार आहे. Tiffin मध्ये छान मऊ राहतो. मी मैसुर चटणी बरोबर आणि थोडं butter लावून देते. मैसुर चटणी -तेल गरम करून त्यात चणा डाळ , उडीद डाळ, कांदा , लसूण सुकी मिरची परतून घ्या. गार झाल्यावर तिखट, मीठ, गुळ घालून मिक्सरमध्ये गरजेनुसार पाणी बारीक करून घ्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Manasvi Pawar
Jul-27-2018
Manasvi Pawar   Jul-27-2018

छान आहे रेसिपी मला नावावरून वाटलं ब्रेडचा डोसा.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर