अख्खा मसूर | AKHHA Masur Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • AKHHA Masur recipe in Marathi,अख्खा मसूर, Minal Sardeshpande
अख्खा मसूरby Minal Sardeshpande
  • तयारी साठी वेळ

    8

    1 /4तास
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

4

0

अख्खा मसूर recipe

अख्खा मसूर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make AKHHA Masur Recipe in Marathi )

  • एक वाटी मसूर
  • दोन कांदे
  • एक टॉमेटो
  • पाच सहा लसूण पाकळ्या
  • एक टीस्पून कांदा लसूण मसाला
  • अर्धा टीस्पून लाल तिखट
  • दोन टेबलस्पून तेल
  • अर्धा टीस्पून हळद
  • अर्धा टीस्पून मोहोरी
  • मीठ

अख्खा मसूर | How to make AKHHA Masur Recipe in Marathi

  1. मसूर रात्री भिजत घाला.
  2. सकाळी चाळणीवर काढा.
  3. निवडून घ्या.
  4. थोडं पाणी, हळद घालून वाफवून घ्या.
  5. कांदा, टॉमेटो चिरून घ्या.
  6. लसूण सोलुन पेस्ट करा.
  7. कढईत तेल तापत ठेवा.
  8. त्यात मोहोरी घाला.
  9. ती तडतडली की त्यात कांदा, टॉमेटो, लसूण पेस्ट घाला.
  10. तेल सुटेपर्यंत परता.
  11. आता त्यात हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालून परता.
  12. आता शिजलेले मसूर घालून परता.
  13. मीठ घाला.
  14. पाच मिनिटं वाफ येऊ द्या.
  15. मस्त गरमागरम अख्खा मसूर तयार आहे.

Reviews for AKHHA Masur Recipe in Marathi (0)