मुख्यपृष्ठ / पाककृती / अख्खा मसूर

Photo of AKHHA Masur by Minal Sardeshpande at BetterButter
816
1
0.0(0)
0

अख्खा मसूर

Jul-27-2018
Minal Sardeshpande
485 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अख्खा मसूर कृती बद्दल

रेस्टॉरंट स्टाईल उसळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक वाटी मसूर
  2. दोन कांदे
  3. एक टॉमेटो
  4. पाच सहा लसूण पाकळ्या
  5. एक टीस्पून कांदा लसूण मसाला
  6. अर्धा टीस्पून लाल तिखट
  7. दोन टेबलस्पून तेल
  8. अर्धा टीस्पून हळद
  9. अर्धा टीस्पून मोहोरी
  10. मीठ

सूचना

  1. मसूर रात्री भिजत घाला.
  2. सकाळी चाळणीवर काढा.
  3. निवडून घ्या.
  4. थोडं पाणी, हळद घालून वाफवून घ्या.
  5. कांदा, टॉमेटो चिरून घ्या.
  6. लसूण सोलुन पेस्ट करा.
  7. कढईत तेल तापत ठेवा.
  8. त्यात मोहोरी घाला.
  9. ती तडतडली की त्यात कांदा, टॉमेटो, लसूण पेस्ट घाला.
  10. तेल सुटेपर्यंत परता.
  11. आता त्यात हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालून परता.
  12. आता शिजलेले मसूर घालून परता.
  13. मीठ घाला.
  14. पाच मिनिटं वाफ येऊ द्या.
  15. मस्त गरमागरम अख्खा मसूर तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर