खीचडी | Khichdi Recipe in Marathi

प्रेषक safiya abdurrahman khan  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khichdi recipe in Marathi,खीचडी, safiya abdurrahman khan
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

खीचडी recipe

खीचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khichdi Recipe in Marathi )

 • 1 कप तांदूळ
 • 1/4 कप तूवार डाळ
 • 1/4 कप मटार
 • 3.5 कप गरम पाणी
 • 1 टेस्पून तेल
 • 2 चिमटी मोहोरी
 • 2 हीरवी मिरची
 • 1/4 टिस्पून जिरे
 • 1/4 टिस्पून हळद
 • चवीपुरते मिठ

खीचडी | How to make Khichdi Recipe in Marathi

 1. खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि डाळ एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवावे. पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.
 2. लहान कूकरमध्ये तेल गरम करावे त्यात मोहोरी, जिरे, हळद, हीरवी मिरची घालून फोडणी करावी.
 3. नंतर डाळ आणि तांदूळ घालून परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतावे. डाळ-तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजेत.
 4. डाळ तांदूळ परतले कि मटार टाकून थोडासा वेळ आणखी परतावे. नंतर यात गरम पाणी आणी मिठ घालावे.
 5. पाण्याला उकळी आली कि कूकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या होवू द्याव्यात. वाफ मुरली (साधारण १० मिनीटे) कि कूकर उघडून खिचडी सर्व्ह करावी. खिचडीवर १ चमचा तूप घालावे.

Reviews for Khichdi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती